शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचे हृदय मुंबईच्या मदतीला धावून आले

By admin | Updated: December 20, 2015 03:01 IST

गुजरातहून निघालेले हृदय अवघ्या १ तास ३२ मिनिटांत मुंबईच्या रुग्णालयात पोहोचल्यामुळे एका ५८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले. मुंबईतील ही पाचवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

मुंबई : गुजरातहून निघालेले हृदय अवघ्या १ तास ३२ मिनिटांत मुंबईच्या रुग्णालयात पोहोचल्यामुळे एका ५८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले. मुंबईतील ही पाचवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असून राज्यात पहिल्यांदाच राज्याबाहेरून अवयव आणण्यात आला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दान केलेला अवयव दुसऱ्या राज्यातून आणला गेला. नेहमी होणाऱ्या प्रत्यारोपणांमध्ये राज्यातील अन्य भागांतून दान केलेले अवयव आणले जातात. दुसऱ्या राज्यातून अवयव आणण्यासाठी दोन्ही राज्यांतून परवानगी घेणे बंधनकारक असते. स्वयंसेवकांच्या नेटवर्कमधून सुरत येथील महावीर रुग्णालयातून हृदय मिळू शकते, असे फोर्टिस रुग्णालय आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला समजले. त्यामुळे समन्वय समितीने सकाळी साडेदहाला गुजरातच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला, असे समन्वय समितीकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाशी संपर्क साधल्यावर त्यांना हृदय मुंबईत आणण्यास परवानगी मिळेल का, असे विचारण्यात आले. त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये हृदयासाठी प्रतीक्षा यादीत कोणी आहे की नाही, हे तपासून पाहिले. त्यानंतर पुढच्या गोष्टींची पूर्तता करण्यात आली. त्यादरम्यान दुपारी ‘नॅशनल आॅर्गन अ‍ॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लाण्ट आॅर्गनायझेशन’शी संपर्क साधण्यात आला. त्यांनीही हृदय गुजरातहून मुंबईत आणण्यास परवानगी दिली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुजरातच्या आरोग्य विभागाने परवानगी दिली. त्यानंतर पुढच्या साडेतीन तासांत हृदय मुंबईत आणण्याची तयारी झाल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री १२ वाजून ८ मिनिटांनी हृदय रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर ५८ वर्षीय पुरुषावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. हा रुग्ण गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत होता. पण गेल्या १० दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खालावल्याने तो रुग्णालयात दाखल होता. त्या रुग्णाला कार्डिओमयोपॅथी झाल्याचे निदान झाले. कार्डिओमयोपॅथीत हृदयाचे स्नायू, रक्तवाहिन्या कडक होतात. त्यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. रक्ताभिसरण थांबते. त्यामुळे अशा रुग्णांना हृदय प्रत्यारोपण हा अंतिम पर्याय असतो. ‘डोनेट लाइफ’चे विभागीय संचालक नीलेश मंडलेवाला यांनी ४८ वर्षीय पुरुषाच्या नातेवाइकांना अवयव दान करण्यासाठी समुपदेशन केले. त्यामुळे सुरतच्या ४८ वर्षीय पुरुषाच्या नातेवाइकांनी हृदय दान करण्याचा निर्णय घेतल्याने या रुग्णास जीवनदान मिळाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. ४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबईत झालेली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आमच्या रुग्णालयात झाली होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या राज्यातून अवयव आणून झालेली पहिली प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही आमच्या रुग्णालयात झाली याचा आनंद आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. भविष्यातही अवयवदानाचा, हृदयदानाचा टक्का वाढल्यास अनेकांना जीवनदान मिळू शकते, असे फोर्टिस रुग्णालयाच्या संचालिका डॉ. एस. नारायणी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)असा झाला हृदयाचा प्रवास... रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी सुरतच्या महावीर रुग्णालयातून प्रवास सुरू झाला. वेगवान प्रवासात २६९ किलोमीटरचे अंतर १ तास ३२ मिनिटांत कापले. पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.कुठे करण्यात आला होता ग्रीन कॉरिडोर? एअरपोर्ट आणि ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन चार्टड फ्लाइटसाठी सुरत ते मुंबई अवकाश मार्गावर ग्रीन कॉरिडोर केला होता. मुंबईत एअरपोर्टच्या गेट क्रमांक ८ पासून ते फोर्टिस रुग्णालय या मार्गावर ग्रीन कोरिडोर करण्यात आला होता. सांताक्रूझ विमानतळ गेट क्रमांक ८ - मिलिटरी रोड - सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड - छेडा नगर ते ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे - ऐरोली जंक्शन - फोर्टिस रुग्णालय, मुलुंड