शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या विकासाचे श्रेय गुजराती समाजाचे?

By admin | Updated: May 10, 2014 01:37 IST

मुंबईच्या विकासाचे श्रेय गुजराती समाजाचे असल्याचे सांगणार्‍या बेस्ट बसेसवरील जाहिरातींना मनसेने विरोध केला आहे.

मुंबई : पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलेला असला तरी मुंबईच्या विकासाचे श्रेय गुजराती समाजाचे असल्याचे सांगणार्‍या बेस्ट बसेसवरील जाहिरातींना मनसेने विरोध केला आहे. मनसेने जाहिरातीचा हा मुद्दा उचलून धरल्याने आधीच गुजराती समाजाच्या मुद्द्यावरून अडचणीत असलेल्या शिवसेनेची पुरती गोची झाली आहे. ‘मुंबईनी आर्थिक प्रगतिमा, बौद्धिक विकासमा कोण? आपणो गुजराथी’ अशा आशयाची जाहिरात बेस्टच्या दोनशे बसगाड्यांवर काही दिवसांपासून झळकत आहे़ या गुजराती दैनिकाने बेस्ट बसवरील जाहिरातीतून मुंबईच्या विकासाचे श्रेय थेट गुजराती समाजाला दिले आहे़ ही जाहिरात म्हणजे मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्या सर्वच थोर व्यक्तींच्या कर्तृत्वालाच आव्हान असल्याचा संताप मनसे सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत आज व्यक्त केला़ मुंबईतील गुजराती समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी हे वृत्तपत्र बांधील असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे़ यावर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा घेतला़ संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले़ भागोजी कीर, नाना शंकरशेठ यांनी मुंबईसाठी स्वत:च्या जागा दिल्या़ त्यांचे योगदान नाही का, असा संताप मनसेच्या नगरसेवकांनी व्यक्त केला़ गुजराती समाजाबद्दल मुखपत्रातील अग्रलेखाच्या वादातून सुटका होत नाही तोच शिवसेनेसमोर ही नवीन अडचण उभी राहिली आहे़ (प्रतिनिधी)

अन्यथा मनसे स्टाईलने कारवाई मराठी माणसाचा अवमान करणारी ही जाहिरात बेस्टच्या बसेसवरून तात्काळ काढली नाही तर मनसे स्टाईलने कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा संदीप देशपांडे यांनी दिला़ याची गंभीर दखल घेत बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी ही जाहिरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी असेल, तर काढली जाईल, असे आश्वासन दिले आहे.