शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आसूड यात्रा गुजरात पोलिसांनी रोखली, नेत्यांना घेतलं ताब्यात

By admin | Updated: April 20, 2017 18:43 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधून सुरू झालेली प्रहार व शेतकरी संघटनेची सीएम टू पीएम आसूड यात्रा गुजरात पोलिसांनी रोखली

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 20 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधून सुरू झालेली प्रहार व शेतकरी संघटनेची  सीएम टू पीएम आसूड यात्रा गुजरात पोलिसांनी रोखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर गावाकडे निघाली होती. महाराष्ट्रातील नवापूर तालुका सरहद्दीबाहेर गुजरात राज्यात प्रवेश करताच गुजरात पोलिसांनी ही यात्रा अडवली.
 
आसूड यात्रेचे  नेतृत्व करणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे आदींना गुजरात पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे, असे स्वतः पटारे यांनी "लोकमत"ला सांगितले.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगरमध्ये उद्या आसूड यात्रा पोहोचणार होती. पण, त्याआधीच आज नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवर ही आसूड यात्रा रोखण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून याचा निषेध केला.    
सध्या चेकपोस्टर गुजरात पोलिसांना प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.      
           
यापूर्वी, आसूड यात्रा पूर्ण होण्याआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा महात्मा गांधींच्या भूमिकेत मोदींच्या वडनेरमध्ये पोहोचणारी यात्रा भगतसिंग यांची भूमिका घेईल असा खणखणीत इशाराही बच्चू कडू यांनी सरकारला दिला.