शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात-मुंबई रेल्वे सेवा १२ तास ठप्प

By admin | Updated: July 5, 2016 01:52 IST

जेएनपीटीहून मुरादाबाद येथे जात असलेल्या मालगाडीच्या डब्यांची चाके सोमवारी पहाटे २.५० च्या सुमारास लोणीपाडा (थर्मल पावर) डहाणू येथे लाईन क्रॉसींगमध्ये अडकल्याने तिचे ११ डबे घसरले.

- शौकत शेख,  डहाणू

जेएनपीटीहून मुरादाबाद येथे जात असलेल्या मालगाडीच्या डब्यांची चाके सोमवारी पहाटे २.५० च्या सुमारास लोणीपाडा (थर्मल पावर) डहाणू येथे लाईन क्रॉसींगमध्ये अडकल्याने तिचे ११ डबे घसरले. या अपघातात जिवितहानी झाली नसली, तरी मुंबईहून गुजरातमार्गे दिल्लीला जाणाऱ्या व येणाऱ्याही हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. अनेक लांबपल्याच्या गाड्या १२ तासांहून अधिक काळ ठिकठिकाणी अडकून पडल्याने त्यामधील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेच्या लांब पल्याच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजले. अपघाताचे नेमके कारण प्रशासनाने स्पष्ट केले नसून त्याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले. दिल्ली व गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या १२ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. राजधानी, आॅगस्ट क्रांती, सयाजी एक्सप्रेस यासारख्या लांबपल्याच्या अतिजलद गाड्या ओव्हरहेड वायर तुटल्याने डिझेल इंजिनच्या साह्याने पुढे नेण्यात आल्या. रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प.रेचे प्रयत्न सुरू आहेत. पावसामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सध्या बोईसर ते विरार लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान डहाणू रेल्वेस्थानकात खोळंबलेल्या प्रवाशांना बोईसर, ठाणेपर्यंत सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली.