शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोषींना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी!

By admin | Updated: June 20, 2017 02:49 IST

१९९३ बॉम्बस्फोटांप्रकरणात दोषी ठरवलेल्या सहा जणांना जास्तीतजास्त शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने विशेष टाडा न्यायालयात सोमवारी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९३ बॉम्बस्फोटांप्रकरणात दोषी ठरवलेल्या सहा जणांना जास्तीतजास्त शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने विशेष टाडा न्यायालयात सोमवारी केली. शिक्षेसंदर्भातील युक्तिवादाला सुरुवात कुणी करावी, यावरून वाद उपस्थित झाला असता याबाबत नंतर निर्णय घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.आरोपींविरुद्ध कोणते पुरावे आहेत, हे सरकारी वकील न्यायालयापुढे मांडतील आणि त्यानुसार आरोपीला शिक्षा देण्याची मागणी करतील. त्यामुळे सरकारी वकिलांनाच आधी युक्तिवाद करण्यास सांगावा, अशी विनंती अबू सालेमचे वकील सुदीप पासबोला यांनी विशेष न्यायालयाला केली.तर, बचावपक्षाच्या वकिलांना आधी युक्तिवाद करण्यास सांगावा, अशी विनंती विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी न्या. जी. ए. सानप यांना केली. कायद्यांतर्गत नमूद करण्यात आलेली जास्तीतजास्त शिक्षा प्रत्येक दोषीला ठोठावण्यात यावी, अशीच विनंती आम्ही न्यायालयाला करणार, असे साळवी यांनी विशेष टाडा न्यायालयाला सांगितले.फिरोज खान याने स्वत:ची बाजू भक्कम करण्यासाठी कारागृहातील काही आरोपींची व स्वत:ची साक्ष नोंदवण्याची विनंतीही त्याने अन्य एका अर्जाद्वारे न्यायालयाला केली आहे. त्याचा हा अर्ज मान्य करत न्यायालयाने त्याचे वकील वहात्त खान यांना मंगळवारपासूनच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचे निर्देश दिले.त्याने तिसरा अर्ज ‘प्रोबेशन आॅफ आॅफेन्डर अ‍ॅक्ट’अंतर्गत केला आहे. या कायद्यांतर्गत पहिल्यांदाच दोषी ठरवलेल्या व्यक्तीची शिक्षा स्थगित केली जाऊ शकते व त्याला प्रोबेशन मिळू शकते. या अर्जावर निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने प्रोबेशन अधिकाऱ्याला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. गेल्या शुक्रवारी विशेष न्यायालयाने १९९३ बॉम्बस्फोटांप्रकरणी अबू सालेमसह, मुस्तफा डोसा, रियाझ सिद्दिकी, ताहीर मर्चंट, फिरोझ खान, करीमुल्ला खान यांना दोषी ठरवले. तर अब्दुल कय्युमची सुटका केली.