शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अधिकाऱ्यांसाठी ‘जाळरेषा’ मार्गदर्शक - राज्यपाल

By admin | Updated: February 22, 2016 03:21 IST

राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी लिहिलेले ‘जाळरेषा’ हे पुस्तक शासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल

मुंबई : राज्याच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी लिहिलेले ‘जाळरेषा’ हे पुस्तक शासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘जाळरेषा’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी, या पुस्तकाच्या लेखिका नीला सत्यनारायण, आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी, अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.राज्यपाल पुढे म्हणाले की, भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना नीला सत्यनारायण यांनी ‘सत्यं वद धर्मं चर’ या उक्तीप्रमाणे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेले ‘जाळरेषा’ हे पुस्तक राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी विशेषत: निवृत्त महिला अधिकाऱ्यांनी वाचण्यासारखे आहे. महाराष्ट्राला आधुनिक आणि प्राचीन साहित्याची उत्कृष्ट परंपरा लाभली आहे. येथील लोक उत्तम पुस्तकांवर प्रेम करतात. नीला सत्यनारायण यांनी लिहिलेल्या ‘जाळरेषा’ पुस्तकामुळे उत्तम पुस्तकांच्या यादीत भर पडली आहे. प्रशासनातील सर्व विभागांमध्ये, प्रशासकीय सेवेत त्याचबरोबर पोलीस सेवेतही अधिकाधिक महिलांचा समावेश आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, त्यांच्यामुळे प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यास तसेच निर्णयप्रक्रियेत नक्कीच मदत होईल. या वेळी श्रीमती नीला सत्यनारायण व नाना पाटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)