शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुडन्युज ....! नवीन वीजजोडणीकरिता महावितरणची घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:46 IST

सोलापूर दि २१ : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी आहे अशा इच्छुक ग्राहकांसाठी 'कनेक्शन आॅन कॉल सेवा' महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे नोंदणी करावी लागणारलवकरात लवकर वीजजोडणी देण्याचा प्रयत्न

सोलापूर दि २१ : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी आहे अशा इच्छुक ग्राहकांसाठी 'कनेक्शन आॅन कॉल सेवा' महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.        नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी तसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार यांच्या निदेर्शानुसार मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल २०१७ पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा आतापर्यंत सुमारे ७९२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून या विशेष कक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.       नवीन वीजजोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी या ग्राहकाची सविस्तर माहिती घेतील.  त्यानंतर या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल.  त्यानुसार त्या कार्यालयातील कर्मचारी वीजजोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन स्वत: या ग्राहकाच्या घरी जातील व फॉर्म भरून घेतील. यावेळी कर्मचारी ग्राहकाचे सर्व विहित कागदपत्रे घेतील आणि त्याला लवकरात लवकर वीजजोडणी देण्याचा प्रयत्न करतील.        नवीन वीजजोडणीसाठी इच्छूक असणाºया ग्राहकाला ओळखपत्र पुरावा म्हणून निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, वाहन परवाना, फोटो पास (शासनमान्यताप्राप्त छायाचित्रित ओळखपत्र), खरेदी-विक्री कराराचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, शासनाने दिलेले वरिष्ठ नागरिकाचे ओळखपत्र यापैकी एक तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका, स्थानिक कर पावती, सक्षम शासकीय अधिकारी यांचा मंजूर नकाशा, घरमालकाचे ना-हरकत प्रमाणत्र (अर्जदार भाडेकरू असल्यास), शासनाने दिलेले मालमत्ता कार्ड किंवा सात-बाराचा उतारा यापैकी एक कागदपत्र महावितरणच्या कर्मचाºयाकडे द्यावे लागणार आहे.        नवीन वीजजोडणीसाठी इच्छूक ग्राहकाने मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.