शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सोने खरेदीविना यंदाचा गुढीपाडवा

By admin | Updated: April 8, 2016 03:30 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावल्यामुळे गेल्या ३७ दिवसांपासून सुरू असलेला सराफा व्यापाऱ्यांचा संप गुढीपाडव्यालाही सुरूच राहणार असल्याने साडेतीन

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावल्यामुळे गेल्या ३७ दिवसांपासून सुरू असलेला सराफा व्यापाऱ्यांचा संप गुढीपाडव्यालाही सुरूच राहणार असल्याने साडेतीन मुहूर्तांपैकी या मुहूर्तावर ग्राहकांना सोने खरेदीपासून वंचित राहावे लागणार आहे. संपामुळे व्यापाऱ्यांचे तर नुकसान होत आहेच; पण सरकारचा महसूल बुडतानाच ग्राहकांचाही हिरमोड होत आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सराफा बाजारात रोज सुमारे २५० कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर एकट्या मुंबईतून यंदा ५०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता होती. गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति तोळा २५ हजार ९५६ रुपये होेता. तो अक्षय्य तृतीय्येला २४ हजारांपर्यंत जाण्याच्या अपेक्षेमुळे पाडव्याला सोने खरेदीत निरुत्साह दिसला होता. मात्र तरीही मुंबईतील सराफा बाजाराने ३५० कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात होणारी वाढ पाहता अक्षय्य तृतीय्येला सोन्याचा दर प्रति तोळा ३० हजारांहून अधिक होण्याची शक्यता होती. त्यामुळे गुढीपाडव्याला अधिकाधिक खरेदी होण्याची शक्यता होती. सरकारने लादलेला अबकारी कर गुरुवारी रात्रीपर्यंत मागे घेण्याची शक्यता धूसर असल्याने शुक्रवारी गुढीपाडव्याच्या दिवशी संप कायम ठेवण्याचा निश्चय संघटनेने केला आहे.> सुटीतही दुकाने सुरू ठेवली होती...मुंबई पालिकेच्या नियमानुसार अनेक ठिकाणी सोमवारी आणि रविवारी सराफांची दुकाने बंद असतात. मात्र याआधी इतिहासात रविवारी व सोमवारी गुढीपाडव्यानिमित्त दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मुहूर्ताचा दिवस असल्याने त्या दिवशी खरेदी-विक्रीचे व्यवहारही झाले होते. मात्र यंदा प्रथमच सुट्टीचा दिवस नसतानाही केवळ संपामुळे दुकाने बंद ठेवण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे.खरेदी-विक्री व्यवहार बंद असला, तरी पाडव्यानिमित्त होणारी पूजा दुकानातच करणार असल्याचे जैन यांनी सांगितले. अनेक दुकानदारांना दिवाळीला चोपडा पूजन करता येत नाही. असे दुकानदार गुढीपाडव्याला चोपडा पूजन करतात. दुकाने बाहेरून बंद असली, तरी पूजेसाठी आतून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, दिल्ली, कोलकात्यासह प्रमुख शहरांतील सराफा प्रतिष्ठाने बंद असली तरीही तामिळनाडूतील सराफांनी संप मागे घेतल्याने तेथील प्रतिष्ठाने खुली आहेत. सराफांच्या मागणीचा विचार करण्यासाठी सरकारने समिती गठित केली असून, ६० दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे.