शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गुढीपाडव्यावर दु:खाचे सावट, गावकरी शोकाकुल!

By admin | Updated: March 22, 2015 01:37 IST

शहीद झालेल्या सूरज मोहिते यांचे मूळगाव असणाऱ्या सिद्धनाथवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी एकही गुढी न उभारता आबा व मोहितेंना आदरांजली वाहिली.

तासगाव/ वाई : ज्या गावाची ओळख आर. आर. पाटील तथा आबांमुळे राज्यभर झाली, त्या ‘अंजनी’त आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सूरज मोहिते यांचे मूळगाव असणाऱ्या सिद्धनाथवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी एकही गुढी न उभारता आबा व मोहितेंना आदरांजली वाहिली.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारीला निधन झाले. यातून हे गाव अद्याप सावरलेले नाही. येथील घराघरात वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन आबांना गृहीत धरूनच केले जायचे, आबाही प्रत्येक कुटुंबांत रमायचे, पण आता आबाच नाहीत, त्यामुळे वर्षभर सणवार, उत्सव, कार्यक्रम करायचे नाहीत, असे जणू गावाने ठरवूनच टाकले आहे. गुढी न उभारता ग्रामस्थांनी आबांना आदरांजली वाहिली. (वार्ताहर)सिद्धनाथवाडीवर दुखवटाच्जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या चौकीवर शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवान सूरज मोहिते यांना वीरमरण आले होते. जवान मोहिते यांचे पार्थिव विशेष विमानाने रविवारी पुण्यात आणण्यात येणार आहे़ तेथून लष्करी वाहनातून पार्थिव त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी (सरताळे, ता. जावळी) येथे आणून नंतर ते सिद्धनाथवाडीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे़ च्सध्या वाई शहरात शोकाकूल वातावरण आहे. सिद्धनाथवाडी व गणेशवाडी (सरताळे) येथे पाडव्यादिवशी गुढी न उभारून दुखवटा पाळण्यात आला़ वाईशहर व परिसरातील गुढीपाडव्यानिमित्त घेण्यात येणारे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले़ तसेच वाईतील नागरिकांनी उस्फूर्तपणे बंदही पाळला.नाशिक : सोसायटीचे साडेसहा लाख रुपये कर्ज काढले, तीन लाखांचा इतर खर्च करीत शिमला मिरचीसाठी साडेनऊ लाख अडकविले; पण निसर्गाने मांडलेल्या खेळाने लाखाचे बारा हजार झाले...एका तासात सारी स्वप्ने अक्षरश: धुऊन नेली, सांगा साहेब कर्ज क सं फेडायचं, तोंडातला घास हिरावून गेल्याने काहीही गोड लागत नाही... अख्खी बाग आडवी झाली.. तुन्हीच सांगा, कसा साजरा करू आम्ही पाडवा... गारपीटग्रस्त निफाड तालुक्यातील बळीराजाची ही व्यथा आहे. येथे ना गुढी उभारली गेली. ना पाडव्याचा गोडवा होता. गारपीट व अवकाळीनं उद्ध्वस्त झालेल्या निफाड तालुक्यातील उगाव, वनसगाव, सारोळे या गावांची शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी पाहणी करत नुकसानीची माहिती जाणून घेत शेतकऱ्यांचे सांत्वन केले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुखातून शब्दही फुटत नव्हते. (प्रतिनिधी)केंद्रीय कृषिमंत्र्यांचा नाशिक दौरासाहेब, वर्षभर जीव लाऊन द्राक्षबागा जोपासल्या. परंतु गारपिटीने सर्व पुरतं बिघडविलं, अशी हतबलता द्राक्ष उत्पादकांनी व्यक्त केली.