शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

गायक अनू मलिकच्या आचाऱ्याला अटक

By admin | Updated: January 25, 2017 05:15 IST

नशेचे व्यसन लागलेल्या २२ वर्षीय तरुणाने एका सायकलची चोरी केली. हा प्रकार वर्सोवा परिसरात दोन दिवसांपूर्वी घडला असून, अटक करण्यात आलेला तरुण प्रसिद्ध गायक अनू मलिक यांचा आचारी असल्याचे समजते.

मुंबई : नशेचे व्यसन लागलेल्या २२ वर्षीय तरुणाने एका सायकलची चोरी केली. हा प्रकार वर्सोवा परिसरात दोन दिवसांपूर्वी घडला असून, अटक करण्यात आलेला तरुण प्रसिद्ध गायक अनू मलिक यांचा आचारी असल्याचे समजते. शोभाराम सोलंकी असे अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. मलिक यांच्या घरी जेवण बनविण्याचे तसेच अन्य लहान-मोठ्या कामांत मदत करण्याचे काम तो करायचा.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी याने मलिक यांच्याआधी अनेक मोठ्या सेलीब्रिटींकडे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे होणाऱ्या पार्ट्यामध्ये दारू तसेच अमलीपदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन त्याला लागले. मात्र अमलीपदार्थ विकत घेण्याइतके पैसे त्याच्याकडे नसायचे. त्या वेळी त्याच्या एका मित्राने त्याला ‘पैसे नसतील तर सोसायटीतील महागड्या सायकल चोरू आणि त्या विकू,’ असे सांगितले. तेव्हा त्याने सायकलची चोरी करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने वर्सोव्याच्या उच्चभ्रू सोसायट्यांमधील जवळपास ११ सायकली लंपास केल्या. यातील प्रत्येक सायकलची किंमत २० हजार रुपयांहून अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी या सोसायटीतील सीसीटीव्ही फूटेज पडताळून पाहिले. यात सोलंकीबाबत त्यांना माहिती मिळाली; त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी पोलीस त्याच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)