शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

पालकमंत्र्यांची जीभ पत्रकारांवर घसरली, बुटाने मारण्याची भाषा

By admin | Updated: May 27, 2017 20:12 IST

पालकमंत्र्यांनी तालुक्यातील माळहिवरा येथील सभेत पत्रकारांना चक्क बुटाने मारण्याची भाषा वापरली

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 27 - तूर खरेदीचा गोंधळ सुरू असताना पालकमंत्री दिलीप कांबळे तिकडे फिरकलेही नव्हते. आता तीन दिवस शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी आल्यानंतर जणू पिकनिकला आल्याप्रमाणे त्यांनी मोंढ्यात भेट दिली. शेतक-यांचे म्हणनेही ऐकून घेतले नाही. त्यामुळे सर्वच माध्यमांनी टीकेचा सूर आळवताच पालकमंत्र्यांनी तालुक्यातील माळहिवरा येथील सभेत पत्रकारांना चक्क बुटाने मारण्याची भाषा वापरली.
पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोलीचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी दिलेल्या आश्वासनांची जंत्री मोठी आहे. मात्र त्यातील पूर्ण झालेल्या कामांची संख्या तपासली तर शून्य आहे. त्यामुळे त्यांच्या या वाचाळवाणीचा सर्वच माध्यमांकडून वारंवार समाचार घेतला जातो. मात्र मोंढ्यात ते फक्त एकाच शेतक-याचे ऐकून निघून गेल्याचे वर्तमानपत्रांतून छापून आल्यानंतर आपली निष्क्रियता लपविण्यासाठी मी जंगलाचा राजा आहे, हे सांगण्याची मला गरज नाही, अशी आत्मस्तुती कांबळे यांनी केली. तर आम्ही हारतुरे स्वीकारले तर तुझ्या पोटात का दुखतयं, असा एकेरी उल्लेख केला. तर पत्रकारांची जातच बांडगुळ असे म्हणत या पत्रकारांच्या जीवावर आमचे राजकारण आहे का?  पाकिटं दिली की, हे लगेच दुस-याचे. मी खरा आहे. मी कोणाला घाबरत नाही. दांडकेवाल्याला अन् लिहिणाºयांनाही. एखाद्याला जोड्याने मारेल, असे फुत्कार काढले.
 
वक्तव्याचा निषेध
पालकमंत्र्यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विविध पत्रकार संघटनांनी निषेध केला. रविवारी याबाबत जिल्हा प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच पत्रकार आंदोलनाच्याही पवित्र्यात आहेत.