शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

पाच महसुली जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भाजपाकडे

By admin | Updated: December 27, 2014 04:57 IST

राज्यातल्या सहापैकी पाच महसुली जिल्ह्यांसह एकूण २४ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भारतीय जनता पार्टीने स्वत:कडे ठेवले असून, शिवसेनेला मुंबई शहरासह १२ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले

अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यातल्या सहापैकी पाच महसुली जिल्ह्यांसह एकूण २४ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भारतीय जनता पार्टीने स्वत:कडे ठेवले असून, शिवसेनेला मुंबई शहरासह १२ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्रिपदाबरोबर आता पालकमंत्रिपदांतही शिवसेनेला बरोबरीचा नव्हे, तर अर्धाच वाटा मिळाला.उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या पदरी फक्त एकेक पालकमंत्रिपद आलेले आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे वर्चस्व असताना तेथील चार जिल्हे भाजपाने स्वत:कडे ठेवले आहेत. कोकणातील रायगड आणि पालघर हे दोन जिल्हे भाजपाने घेतले. भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून ही व्यूहरचना भाजपाने आखली आहे. शिवाय पाच मंत्र्यांना दोन-दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.तुल्यबळ नेत्यांना त्यांचे स्वत:चे जिल्हे देऊ करण्यात आले आहेत. त्यात एकनाथ शिंदे (ठाणे), एकनाथ खडसे (जळगाव), गिरीश बापट (पुणे), रणजीत पाटील (अकोला), चंद्रपूर (सुधीर मुनगंटीवार), चंद्रकांत पाटील (कोल्हापूर) आणि पंकजा मुंडे (बीड) यांचा समावेश आहे. सेनेचे कोकणातील लढवय्ये नेते रामदास कदम यांना औरंगाबादचे पालकमंत्रिपद दिले आहे. रायगड जिल्ह्यात भाजपाचा एकच आमदार असताना तेथे प्रकाश मेहतांना पालकमंत्रिपद दिले आहे. बीड आणि लातूरचे पालकमंत्रिपद पंकजा मुंडेंना दिले आहे. अमित देशमुख यांचे आणि मुंडे परिवाराचे सख्य सर्वश्रुत आहे.११ आमदार देणाऱ्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांना देऊन हा जिल्हा नितीन गडकरींच्या वर्चस्वाखाली ठेवण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नजीकचे म्हणून ओळखले जाणाऱ्या रणजीत पाटील यांना अकोला आणि वाशिमचे पालकमंत्रिपद दिले गेले आहे. प्रवीण पोटे यांना अमरावतीचे पालकमंत्रिपद देऊन गडकरी गटाचे आ. सुनील देशमुख यांची अडचण करण्याचा प्रयत्न झाला आहे. देशमुख-पोटे यांचे फारसे सख्य नाही. यवतमाळमध्ये सातपैकी पाच भाजपाचे आमदार असताना शिवसेनेचे संजय राठोड यांना पालकमंत्री करण्यात आले आहे. या पाचही आमदारांनी रणजीत पाटील यांची मागणी केली होती. तेथे शिवसेनेची सरशी झाली आहे. साताऱ्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे विजय शिवतारे यांना दिले गेले आहे. त्यांचे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यातील भांडण सर्वश्रूत आहे. तर नाशिकचे पालकमंत्रीपद जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना देऊ केले आहे. शिवाय महाजन यांच्याकडे महाकुंभ मेळाव्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. महाजन यांचे आणि एकनाथ खडसे यांचे संबंध फारसे मधूर नाहीत. त्या पार्श्वभूमीवर महाजनांवर टाकलेली मोठी जबाबदारी चर्चेचा विषय आहे-------------जिल्हा आणि पालकमंत्री असेपुणे- गिरीश बापट, मुंबई उपनगर-विनोद तावडे, मुंबई शहर-सुभाष देसाई, पालघर-विष्णु सावरा, बीड आणि लातुर- पंकजा मुंडे, जळगाव व बुलढाणा- एकनाथ खडसे, अहमदनगर- राम शिंदे, सिंधुदुर्ग- दिपक केसरकर, रत्नागिरी- रविंद्र वायकर, धुळे - दादा भुसे, सातारा- विजय शिवतारे, यवतमाळ- संजय राठोड, सोलापुर- विजय देशमुख, अमरावती -प्रविण पोटे, परभणी व नांदेड- दिवाकर रावते, भंडारा, उस्मानाबाद- दिपक सावंत, नागपुर- चंद्रकात बावनकुळे, वर्धा, चंद्रपुर- सुधीर मुनगंटीवार, वाशिम, अकोला- रणजीत पाटील, हिंगोली - दिलीप कांबळे, जालना - बबनराव लोणीकर, औरंगाबाद -रामदास कदम, गडचिरोली -राजे अंम्ब्रीशराव आत्राम, गोंदिया -राजकुमार बडोले, ठाणे - एकनाथ शिंदे, नाशिक व नंदूरबार - गिरीष महाजन, सांगली व कोल्हापूर - चंद्रकांत पाटील, रायगड - प्रकाश मेहता