शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 19:16 IST

मुंबईप्रमाणेच ठाण्यालाही मुसळधार पावसाने मंगळवारी झोडपून काढल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

ठाणे, दि. 30 - मुंबईप्रमाणेच ठाण्यालाही मुसळधार पावसाने मंगळवारी झोडपून काढल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले. पावसाचे पाणी तुंबलेल्या आणि नाल्यातली घाण रस्त्यावर आणि वस्तीत घुसलेल्या परिसराची सफाई जलदगतीने करण्याबरोबरच रोगराई पसरू नये यासाठी औषध फवारणी करण्याचे निर्देशही त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. शिंदे यांच्या आदेशांनुसार महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असून जेसीबी, पोकलेन आणि डम्परच्या साह्याने साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे.

पालकमंत्री शिंदे यांनी बुधवारी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आंबेवाडी, अंबिकानगर, वाल्मिकी पाडा, राजीव गांधी मार्केट, रतनबाई कंपाउंड, धर्मवीर नगर, जीलानी वाडी, हाजुरी आदी परिसराला भेट दिली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांमधील घाण वाहून आल्यामुळे घाणीचे साम्राज्य होते. श्री. शिंदे यांनी त्वरित जेसीबी आणि डम्परच्या साह्याने साफसफाई सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे घाणीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी संपूर्ण परिसरात औषध फवारणीचे आदेशही दिले आहेत.

पावसामुळे काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश श्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. काही ठिकाणी नाल्यांचे नुकसान झाले असून नाल्यांच्या भिंती तसेच नाल्यांवरील पुलांचेही नुकसान झाल्यामुळे याठिकाणी त्वरित दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देशही श्री शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले.

मंगळवारच्या पावसात धर्मवीर नगर आणि रामनगर येथे काही व्यक्ती नाल्याच्या प्रवाहात वाहून जाण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या. श्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध कार्य जोमाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे