शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांची मजबुतीची खेळी

By admin | Updated: September 21, 2016 03:53 IST

शिवसेनेचा ठाण्यातील बालेकिल्ला अभेद्य करतानाच आपला विधानसभा मतदारसंघही मजबूत करण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत.

ठाणे : शिवसेनेत मंगळवारी प्रवेश करणाऱ्या चार नगरसेवकांमधील तीन नगरसेवक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातील असल्याने शिवसेनेचा ठाण्यातील बालेकिल्ला अभेद्य करतानाच आपला विधानसभा मतदारसंघही मजबूत करण्यात शिंदे यशस्वी झाले आहेत.ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षातील प्रस्थपित नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेत प्रवेश केलेल्या चारपैकी एक नगरसेवक हा ठाणे शहर मतदार संघातील आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या चुली मांडून आपापली ताकद अजमावून पाहिली होती. त्यावेळी दोन्ही पक्षात इनकमिंगचा सिलसिला पाहण्यास मिळाला होता. आता ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाणे शहरातील फेऱ्या वाढल्या आहेत. ठाण्यात कल्याण-डोंबिवलीच्या तुलनेत भाजपाची ताकद कमी आहे. मात्र अन्य पक्षातील मातब्बर नगरसेवक गळाला लावून भाजपा वाढल्याचे चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न त्या पक्षाने सुरु केले आहेत. खासदार कपिल पाटील आणि आमदार संजय केळकर यांनी त्याकरिता प्रयत्न सुरु केले आहेत. वागळे इस्टेटमध्ये अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या अपक्ष नगरसेवक स्वाती देशमुख यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर, काँग्रेसच्याच नगरसेविका मेघना हंडोरे व त्यांचे पती यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी भाजपाच्या फोडाफोडीला शह देताना कोपरी, वागळे इस्टेट आणि नौपाडा प्रभागातील चार नगरसेवकांना गळाला लावून स्वत:ची व पक्षाची ताकद वाढवली आहे.(प्रतिनिधी)आतापर्यंत दिव्यातील मनसेचे दोन नगरसेवक, वागळे इस्टेट येथील काँग्रेसचे सहा नगरसेवक आणि उथळसर येथील काँग्रेसचे नगरसेवक राजा गवारी यांना शिवसेनेत आणण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेत आलेले राष्ट्रवादीचे सुभाष भोईर आणि काँग्रेसचे रवींद्र फाटक आता आमदार झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेत आणलेल्यांचा फायदा होतो हा संदेश शिंदे सध्या कुंपणावरील आजी-माजी नगरसेवकांना देत आहेत. नव्या प्रभाव रचनेनंतर नेमके चित्र स्पष्ट होईल व त्यानंतर युतीबाबतच्या संभ्रमाला पूर्णविराम मिळेल. त्यानंतर अन्य पक्षांमधील असंतुष्टांकरिता भाजपा व शिवसेनेत खेचाखेची होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.