शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

डीपीएस शाळेच्या फीवाढीविरोधात पालक आक्रमक

By admin | Updated: April 30, 2016 02:38 IST

शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शाळांना १५ टक्के फीवाढ करण्याची परवानगी दिली

नवी मुंबई : शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शाळांना १५ टक्के फीवाढ करण्याची परवानगी दिली असून या नियमाचे उल्लंघन करून एनआरआय परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूल प्रशासनाने १७ टक्के फीवाढ केली आहे. मागील वर्षी या शाळेने १३ टक्के वाढ केली असून या शैक्षणिक वर्षात मात्र मागील वर्षीच्या तलनेत ४ टक्के अधिक वाढ केली आहे. पालकांनी शाळा प्रशासनाच्या या लूटमारीला विरोध करून शुक्रवारी शाळेबाहेर तीव्र आंदोलन केले. फी शुल्क नियंत्रण कायद्याच्या अधीन राहून फीवाढ करणे आवश्यक असून डीपीएस शाळा प्रशासन मात्र नियमांचे पालन न करता मनाजोगी फीवाढ केल्याची तक्रार पालकांनी केली आहे. पीटीएची परवानगी न घेता ही वाढ करण्यात आली असून शाळेवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. याआधीही शाळा प्रशासनाविरोधात पालकांनी आंदोलन केले होते मात्र त्यावेळी २६ एप्रिलपर्यंत फीवाढीसंदर्भात प्रशासनाच्या वतीने पालकांना उत्तर दिले जाणार होते. तीन दिवस उलटूनही उत्तर न आल्याने पालकांनी पुन्हा शाळेविरोधात आंदोलन केल्याची माहिती दिली. १००० हून अधिक पालकांनी या फीवाढीला विरोध केला असून ती रोखण्यात यावी अशी मागणी केली आहे. पीटीएच्या नियमांचे पालन न करता शाळा प्रशासन मनमानी करत असल्याने पालकांची लूट होत आहे. काही पालकांनी शाळा प्रशासनाला फीवाढीविरोधात जाब विचारला असता शिक्षकांची पगारवाढ करणे तसेच इतर काही कारणास्तव फीवाढ केल्याचे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक जे. मोहंती यांनी शाळेच्या व्यवस्थापन समितीसोबत बैठक घेऊन त्यानुसार शैक्षणिक शुल्कातील वाढ ठरविण्यात आल्याचे सांगितले. या आंदोलनात उपस्थित पालकांनी शाळेविषयीची तक्रार मांडताना पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांकडूनही संगणक फी घेतली जात असून त्याचे प्रशिक्षण मात्र दिले जात नसल्याचे स्पष्ट केले. पालकांना लुबाडण्यात येत असून मातृभाषा मराठी असलेल्या मुलांना प्रवेशाकरिता डावलण्यात येत असल्याची व्यथा पालकांनी मांडली.>नियमानुसार दोन वर्षात एकदा फीवाढ करता येत असून यासाठी देखील १५ टक्के इतकी मर्यादा आहे. डीपीएस प्रशासनाने मात्र मर्यादा तसेच नियमांचे पालन न करता वर्षभरातच १७ टक्के फीवाढ लागू केल्याने पालकांची लूट होत आहे. शाळा प्रशासनाने फीवाढीला स्थगिती दिली नाही तर कायदेशीर कारवाई केली जाऊन तोपर्यंत पालकांचे आंदोलन सुरूच राहणार आहे.- दीपक पवार, नगरसेवक