शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

हमी देतो, कर्जमाफी द्या!

By admin | Updated: May 22, 2017 04:30 IST

तुम्ही कर्जमाफी द्या; राज्यातील शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची आम्ही लेखी हमी देतो, असे थेट आव्हान राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी आज सरकारला दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तुम्ही कर्जमाफी द्या; राज्यातील शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची आम्ही लेखी हमी देतो, असे थेट आव्हान राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी आज सरकारला दिले. मागील अधिवेशनात विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरल्यानंतर ‘कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची विरोधक हमी घेणार का,’ असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. जयंत पाटील यांनी आज विरोधकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान स्वीकारले. केंद्राने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कराच्या धर्तीवर (जीएसटी) राज्याचा कायदा करण्यास विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. रविवारी विधानसभेत याविषयी बोलताना माजी मंत्री पाटील यांनी सरकारवर तीन तास प्रश्नांची सरबत्ती केली. अर्थमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली, पण राज्यात दारूचा महापूर आला. राज्यात दारुबंदी करून दाखवा, असे आव्हान त्यांनी सुधीर मुनगंटीवारांना दिले. सरकारचा प्राधान्यक्रम कशाला आहे? ४५ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग, एक लाख कोटींची बुलेट ट्रेन, काही हजार कोटींची मेट्रो, २७ हजार कोटींचा सातवा वेतन आयोग, अशा करोडोंच्या नुसत्या घोषणा सरकार करत आहे. पण सरकारचा प्राधान्यक्रम कशाला आहे? एवढा पैसा आणणार कोठून, हे सांगितले जात नाही. नोटाबंदीनंतर नव्या नोटा छापायला सरकारने ३० हजार कोटी खर्च केले. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगितले जात आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात या सरकारने कोणतीही एक योजना धड अमलात आणली नाही. मेक इन महाराष्ट्राचा नुसता गाजावाजा केला. एकही मोठा उद्योग सुरू झालेला नाही. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार, तूर खरेदीत ४०० कोटींचा घोटाळा. तरीही मुख्यमंत्री गप्प. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मते सरकारमध्ये दरोडेखोर बसले आहेत. खरेच तसे आहे का, असा बोचरा सवाल पाटील यांनी केला.गाळ काढण्याचे काम पाहावे का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सांगली जिल्ह्याचा दौरा केला. तेथे त्यांनी दिवसभरात तीन ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला भेटी दिल्या. हे काम काय राज्याच्या प्रमुखाचे आहे का? जलसंधारणमंत्री नीट काम करत नाहीत म्हणून मुख्यमंत्र्यांना हे काम करत फिरावे लागते, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात धोतर, लुगड्यावरही १० टक्के कर लावला आहे. लहान लहान हॉटेलांवर १५ टक्के जीएसटी लागणार आहे. व्यापाऱ्यांना ३७ वेळा रिटर्न्स भरावे लागतील. कर भरण्यात थोडी जरी चूक झाली तर व्यापाऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकाल. हे कसे बदलणार, असा सवाल पाटील यांनी केला.