शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी हमी

By admin | Updated: June 22, 2016 04:27 IST

आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पीक कर्जवाटपासाठी २ हजार कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला

मुंबई : आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पीक कर्जवाटपासाठी २ हजार कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नाशिक आणि जळगाव या १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शेतकऱ्यांकडील कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नव्याने कर्जवाटप करण्यात अडचणी येत होत्या. त्यांना आता कर्जवाटपासाठी राज्य सहकारी बँक निधी देईल. कर्जाची परतफेड होऊ शकली नाही तर तेवढा निधी राज्य सरकार राज्य बँकेला देईल, असे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले. (विशेष प्रतिनिधी)काही बँकांकडूनशेतकऱ्यांची अडवणूकपीक कर्ज वाटपाबाबत काही जिल्हा सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, टाळाटाळ केली जाते, असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले की अशी अडवणूक शासन खपवून घेणार नाही. या बँकांविरुद्ध कारवाई केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील बँका आहेत. कर्मचारी पुरसे नाहीत, पुरेसा निधी नाही, ही कारणे चालणार नाहीत, असे त्यांनी बजावले.मराठवाडा ग्रामीण विकास बँकेमार्फत मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले जाते. त्यासाठी या बँकेला नाबार्ड किंवा लिड बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. या दोन्ही बँकांचा व्याजदर आणि पीककर्जाचा व्याज दर यातील फरकाची रक्कम राज्य शासन अदा करेल, असा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. समजा महाराष्ट्र बँकेचा व्याजदर १० टक्के असेल आणि शेतकऱ्यांना ४ टक्के दराने कर्ज दिले जात असेल तर ६ टक्के व्याजाचा भार राज्य शासन उचलेल, असे सहकार मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. १३७७८ कोटींचे वाटपराज्यात यंदा आतापर्यंत २३ लाख १६ हजार शेतकऱ्यांना १३ हजार ७७८ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकांनी १८.१४ लाख शेतकऱ्यांना ८ हजार ४४७ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचा समावेश आहे.