शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

शौचालय उद्दिष्टपूर्तीसाठी ग्रामसचिवांकडूनच ‘हमीपत्र’

By admin | Updated: October 2, 2016 02:47 IST

वाशिम जि.प. मुख्याधिका-याचा आगळा उपक्रम; कामचुकारांवर कारवाई होणार असल्याचे संकेत.

दादाराव गायकवाड वाशिम, दि. १- स्वच्छ भारत मिशनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आगळावेगळा प्रयत्न केला आहे. या अभियानाबाबत जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या कामाचा व्यक्तिगत आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी प्रत्येक ग्रामसचिवांकडून उर्वरित उद्दिष्ट पूर्ती करण्याचे हमीपत्रच त्यांनी प्रत्येकाकडून लिहून घेतले. उद्दिष्टपूर्ती झाली नाही, तर कोणती कारवाई करायची, हेसुद्धा त्यांनी ग्रामसचिवांकडूनच लिहून घेतले. स्वच्छ भारत अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदांच्यावतीने हे अभियान आपापल्या परीने राबवित आहेत. तथापि, ग्रामस्तरावर या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीची जबाबदारी असलेले ग्रामसेवक मात्र फारसे गंभीर नसल्याचे दिसते. वाशिम जिल्ह्यातही अद्याप ३0 हजारांहून अधिक कुटुंबांकडे शौचालये नाहीत. मग जिल्हा हगणदरीमुक्त कसा करायचा, हा प्रश्न उपस्थित होतो. यात ग्रामसचिवांची महत्त्वाची भूमिका असते; परंतु वेळोवेळी बैठका घेऊन, अनेक अधिकारी, कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत ग्रामसचिवांनी हे अभियान कसे राबविले आणि त्याच्या अडचणी काय, ते समजून घेणे आणि त्यांना सूचना करणे कठीणच असते. ही बाब लक्षात घेऊन वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आपल्या कार्यालयात प्रत्येक ग्रामसचिवाशी वैयक्तिक संवाद साधला आणि त्यांच्या कामाची माहिती घेतली. यावेळी अनेक ग्रामसेवकांचे काम निराशाजनक असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे शौचालयाच्या उद्दिष्टपूर्तीसंदर्भात हमीपत्र लिहून देण्याचे आदेशच त्यांनी ग्रामसचिवांना दिले. येत्या २0 ऑक्टोबरपर्यंत किती शौचालय बांधून घेणार, हे स्पष्ट करण्यासह स्वत:च ठरवून दिलेली उद्दिष्टपूर्ती निर्धारित वेळेत झाली नाही, तर कोणत्या प्रकारची कारवाई करायची हेसुद्धा त्या हमीपत्रात त्यांनी ग्रामसचिवाकडूनच नमूद करून घेतले. येत्या २0 ऑक्टोबर रोजी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी या ग्रामसचिवांची ह्यपेशीह्ण घेतील आणि त्यांच्या कामाचा आढावा घेऊन कारवाईची दिशा ठरवतील. यामध्ये बदलीसारख्या कारवाईसह इतर कठोर कारवाईचाही समावेश आहे. उद्दिष्टपूर्ती न झाल्यास करा निलंबित !मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी हमीपत्रात उद्दिष्ट आणि कारवाईचे स्वरूप ग्रामसचिवांना त्यांच्या इच्छेनेच नमूद करण्यास सांगितले. यावेळी काही ग्रामसेवकांनी उद्दिष्टपूर्तीचे आव्हान स्वीकारताना ते नियोजित वेळी पूर्ण न झाल्यास थेट निलंबित करण्याची परवानगीच हमीपत्रात लिहून दिली आहे. शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करणे आणि ही जबाबदारी पार पाडण्याची वृत्ती कर्मचार्‍यांत निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. यासाठी ग्रामसचिवांना स्वत:च लक्ष, वेळ आणि कारवाईचे स्वरूप नमूद असलेले हमीपत्र देण्याच्या सूचना केल्यात. कारवाई हा उद्देश नाही, तर त्यांनी कामाबाबत गंभीर व्हावे, हाच उद्देश आहे. -गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम