शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संप न करण्याची हमी द्या - हायकोर्ट

By admin | Updated: April 19, 2016 03:52 IST

मागण्या मान्य करून घेण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही सामान्य व गरीब रुग्णांना वेठीस धरणाऱ्या मार्डच्या डॉक्टरांना यापुढे संपावर न जाण्याची हमी देण्याचे निर्देश

मुंबई : मागण्या मान्य करून घेण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही सामान्य व गरीब रुग्णांना वेठीस धरणाऱ्या मार्डच्या डॉक्टरांना यापुढे संपावर न जाण्याची हमी देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. तक्रार निवारण समितीचा अहवाल येईपर्यंत संपावर जाणार नाही, अशी लेखी हमी ४ मेपर्यंत द्या, असा आदेश उच्च न्यायालयाने मार्डच्या डॉक्टरांना दिला. तसेच मार्डच्या डॉक्टरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अखेरचे भाषण ऐकावे, असा टोलाही उच्च न्यायालयाने डॉक्टरांना लगावला.जे.जे.चे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांनी निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास देऊ नये, असा निर्णय घेतल्याने जे.जे.च्या रहिवासी डॉक्टरांनी संप पुकारला. डॉ. लहाने व नेत्रचिकित्सक विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी या डॉक्टरांनी सरकारकडे केली. जे. जे. डॉक्टरांच्या संपाला मार्डने राज्यव्यापी संप पुकारून समर्थन केले. त्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडविया यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.गेल्या सुनावणीत खंडपीठाने डॉक्टरांच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार अ‍ॅड. देव यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. सी. डागा यांनी तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष होण्यास सहमती दर्शवल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने राज्य सरकारला यासंदर्भात एका आठवड्यात अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले.दरम्यान, तक्रार निवारण समिती डॉक्टरांच्या अन्य तक्रारी आणि डॉ. लहाने यांच्याबाबतही असलेल्या सर्व तक्रारी ऐकून घेऊन याबाबतचे सत्य शोधेल, अशी माहिती अ‍ॅड. देव यांनी खंडपीठाला दिली. ही समिती जूनमध्ये अहवाल सादर करेल. तोपर्यंत तरी संपावर जाणार नाही, अशी हमी मार्डच्या डॉक्टरांनी द्यावी, असे खंडपीठाने म्हणताच हमी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांना उच्च न्यायालयाने पुन्हा फटकारले. ‘अहवाल येईपर्यंत संप करणार नाही, निदान एवढे तरी आश्वासन द्या. ते देण्यासाठी इतका वेळ का लावता?’ असे खंडपीठाने म्हणताच मार्डने अहवाल येईपर्यंत संपावर न जाण्याचे तोंडी आश्वासन उच्च न्यायालयाला दिले. (प्रतिनिधी)