शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

जीएसटी आधी इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, मोबाईलवर भरघोस सूट

By admin | Updated: June 15, 2017 09:52 IST

जीएसटी लागू होण्याच्या आधी ग्राहकांसाठी खुश खबर आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.15- जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर लागू व्हायला काहीच दिवस शिल्लक आहेत. 1 जुलैपासून संपूर्ण भारतात जीएसटी लागू होणार आहे. पण जीएसटी लागू होण्याच्या आधी ग्राहकांसाठी खुश खबर आहे. जीएसटी सुरू होण्याच्या आधी मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू,  कपडे, मोबाईल तसंच मोबाईल एक्सेसरीज, चपला या वस्तूंच्या खरेदीवर दुकानांमध्ये तसंच ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर भरघोस सूट दिली जाते आहे.  रिटेलरकडून सध्या देण्यात येत असलेल्या मालावर कमी मार्जिन आकारलं जातं आहे. 1 जुलैनंतर कराच्या दरात वाढ  होइल तसंच जीएसटी लागू झाल्यानंतर दुकानात आधी उपलब्ध असलेल्या सामानासंदर्भात बरेच कागदोपत्री व्यवहार करावे लागणार आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी दुकानांमध्ये तसंच ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर स्टॉक क्लिअरिंग सेल सुरू झाला आहे. 
 
दुकानांमध्ये सुरू असलेल्या स्टॉक क्लिअरिंगमध्ये एअर कंडिशनवर दहा ते चाळीस टक्के सूट दिली जाते आहे. तर काही कपड्यांच्या कंपन्याकडून पन्नास टक्के डिस्काऊंटवर कपडे विकले जात आहेत. 
या आठवड्यामध्ये ऑनलाइन मार्केटमधील पेटीएम मॉलने तीन दिवसांचा "प्री-जीएसटी" सेल सुरू केला आहे. 13 जून ते 15 जूनपर्यत हा सेल आहे. या सेलमध्ये सहा हजार रिलेटर्सचा समावेश असून 500 ब्रॅण्ड ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.  इलेक्टॉनिक्स आणि कपड्यांसह दूचाकी गाड्यांच्या किंमतीवरसुद्धा सवलत दिली जाते आहे. बजाज ऑटो ही कंपनी दूचाकीच्या खरेदीवर साडे चार हजार रूपयांची सूट देते आहे. जीएसटी लागू होण्याआधी ग्राहकांना फायदा व्हावा, या हेतूने स्किम सुरू केल्याचं बजाज ऑटो कंपनीने "द इंडियन एक्सप्रेस" या वृत्तपत्राला सांगितलं आहे. 
 
"प्री-जीएसटी सेलमध्ये टीव्ही, ग्राहकांच्या उपयोगाच्या वस्तू, लॅपटॉप, डीएसएलआर कॅमेरा खरेदी केल्यावर वीस हजार रूपयांपर्यंत कॅश बॅक दिला जाईल. तर ब्लूटूथ स्पिकर, चपला, दागिन्यांवर 50 टक्के सूट दिली असून ग्राहकांना 25 टक्के कॅश बॅकसुद्धा दिला जाणार आहे. नवीन कर प्रणाली लागू होण्याआधी दुकानामधील माल संपवावा, या विचाराने किरकोळ विक्रेत्यांनी या सेलसाठी पुढाकार घेतल्याची प्रतिक्रिया पेटीएम मॉलने द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिली आहे.  
 
दिल्लीमधील एका इलेक्टॉनिक दुकांनात एसी खरेदीवर 10 ते 40 टक्क्यांपर्यत सूट दिली जाते आहे. या दुकानाच्या तीन शाखा सध्या दिल्लीत आहेत. पेपे जिन्सच्या अहमदाबादमधील एका दुकानात या आठवड्याच्या सुरूवातीला 40 टक्के सूट देण्यात येत होती पण आता 50 टक्के सूट कपड्यांच्या खरेदीवर दिली जाते आहे. 
फ्लिपकार्ट, अमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग बेवसाइट्सवर बाजारातील तयार कपडे विकले जातात, त्यांना जीएसटी लागू झाला तरी जास्त परिणामांना सामोरं जावं लागणार नाही. पण तरी सध्या असलेला स्टॉक संपविण्यासाठी या साइट्सकडूनसुद्धा भरगोस सूट दिली जाते आहे.