शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परिषदेत जीएसटी विधेयक मंजूर

By admin | Updated: May 22, 2017 00:35 IST

सुमारे पाच तासाच्या चर्चेनंतर विधान परिषदेत वस्तू व सेवाकरासंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुमारे पाच तासाच्या चर्चेनंतर विधान परिषदेत वस्तू व सेवाकरासंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर झाले. राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर पाच वर्षात पाच लाख कोटी रुपयांचा महसूल जमा होऊन राज्याची आर्थिक स्थिती भक्कम राहणार आहे. त्यामुळे राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देण्यास सक्षम असेल, अशी माहिती अर्थ राज्यमंंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तर जीएसटीच्या दरामध्ये समानता असावी, अशी सूचना सदस्यांनी केली.पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीतून वगळण्यात आले असले तरी त्यांच्यावर पूर्वीचा व्हॅट लागू राहणार आहे. इंधनातून राज्यांना २५ टक्के उत्पन्न मिळते. पेट्रोलियम पदार्थांचे दर कमी झाल्याने राज्याला ७५० रुपयांचा तोटा होत होता. त्यानंतर सरकारने पेट्रोलवर कर वाढवला, असे केसरकर यांनी सांगितले.गोव्यामध्ये पर्यटन व्यवसायातून मोठा महसूल मिळत असल्याने तेथील पेट्रोलचे दर काहीसे कमी आहेत; मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर सारखेच आहेत.जीएसटीमध्ये कोणतीही यंत्रणा मोडीत निघणार नाही. वसुलीचे अधिकार विक्रीकर अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बिल्डर लॉबीला वगळण्यात आलेले नसून त्यांचाही समावेश त्यामध्ये असणार आहे. जीएसटीएन ही खासगी कंपनी नसून त्यामध्ये शासनाचा २४.५ टक्के सहभाग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पेट्रोलच्या दराचा मुद्दा उपस्थित केला. तर शेकापचे जयंत पाटील यांनी जिल्हा बँकांमधील थकीत कर्जाच्या मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, जीएसटीमुळे शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्याची यंत्रणा मोडीत निघणार आहे. जिल्हा बँकांकडून जवळपास ६५ हजार कोटी कर्ज वाटप झाले आहे. या त्रिस्तरीय कर रचनेमध्ये ३० हजार कोटी रुपयांची कर्जेमाफी कधी होणार आहे. ती होणार आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला. हेमंत रणपिसे यांनी कायदा सुटसुटीत व सर्वसामान्यांना समजेल, असा असण्याची मागणी केली. जीएसटी लागू झाल्याने निकामी झालेल्या कर्मचारी वर्गांचे वर्गीकरण कोठे करणार, अशी विचारणा राहुल नार्वेकर यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत जोगेद्र कवाडे, हरीभाऊ राठोड, विद्या चव्हाण, डॉ. सुुधीर तांबे, प्रकाश गजभिये , चंद्रकांत रघुवंशी, जगन्नाथ शिंदे, प्रकाश गजभिये, रामहरी रुपनवरे यांनी भाग घेतला.