शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित अन्नधान्य निर्मितीसाठी ‘ग्रो सेफ फूड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 02:40 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे देशभर अभियान.

अकोला, दि. १६- अलीकडच्या काही वर्षांत पीक उत्पादनावर वाढलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण बघता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे देशात ह्यग्रो सेफ फुडह्ण अभियान राबविण्यात येत आहे; पण आजही एका पिकासाठी निर्माण करण्यात आलेले कीटकनाशक दुसर्‍या पिकावर वापर होत असल्याने मानवी आरोग्याला धोका वाढला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मानवी आरोग्याला घातक असलेल्या अशा कीटकनाशकांवर प्रतिबंध घालणे गरजेचे झाले आहे.देशात हजारो कीटकनाशक कंपन्या असून, या सर्व कंपन्यांना कीटकनाशके तयार करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो, (कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशके) कीटकनाशक निर्मितीनंतर त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. मानवी सुरक्षा व सावधानीपूर्वक मूल्यमापन चाचण्यानंतरच केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीद्वारे विशिष्ट उपयोगासाठी नोंदणी व परवाना दिला जातो. निर्मित कीटकनाशकांचा साठा व विक्री करताना मात्र विक्रेते व घाऊक व्यापार्‍यांनी नोंदणीचे नियम व शर्तीनुसारच विक्री करण्याची गरज आहे; पण तसे न करता अनेक ठिकाणी एकाच पिकावर वापरण्याची परवानगी असलेले कीटकनाशक सर्रास सर्वच पिकांवर वापरले जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळाने कापूस या पिकासाठी कीटकनाशकांना परवानगी दिली असते; पण तेच कीटकनाशक सर्रासपणे मूग, तूर किंवा इतर पिकांवर वापरण्याची शिफारस विक्रेते शेतकर्‍यांना करीत असतात. परिणामी, चुकीचे कीटकनाशक वापरल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कीटकनाशके लेबल क्लेमची व्यवस्था आहे; पण शेतकर्‍यांमध्ये याबाबत जनजागृतीची गरज आहे. कीटकनाशक विक्रेत्यांनी निकृष्ट, नकली आणि कमी दर्जाच्या कीटकनाशकांची विक्री, वितरण तसेच साठवणूक करणे हा कीटकनाशक अधिनियम १९६८ नुसार एक गंभीर अपराध आहे. असे करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होते; परंतु अनेक ठिकाणी या अधिनियमांना डावलून सर्रास कीटकनाशके विकली जात असल्याचे वृत्त आहे.

- कापसावरील कीटकनाशके कापसावरच फवारणे गरजेचे आहे; परंतु तीच कीटकनाशके इतर पिकांवर वापरले जात असल्याने मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील एका सामाजिक संघटनेने भाजीपाला पिकावरील विषापेक्षा अधिक आढळलेले कीटकनाशकांचे प्रमाण अधोरेखित करते. त्यामुळे शेतकर्‍यांनीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.डॉ. एन. एम. काळे,विस्तार शिक्षण विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.