शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

तरुणांच्या गटाने बांधली आडोशी गावात विहीर

By admin | Updated: June 10, 2016 03:19 IST

आडोशी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोंबिवलीच्या ‘जीवन परिस’ या तरुणांच्या ग्रुपने चौधरीपाड्यावर श्रमदान व लोकवर्गणीतून एक विहीर खोदली

डोंबिवली : ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मोखाडा तालुक्यातील आडोशी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोंबिवलीच्या ‘जीवन परिस’ या तरुणांच्या ग्रुपने चौधरीपाड्यावर श्रमदान व लोकवर्गणीतून एक विहीर खोदली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून त्यांनी या विहिरीचे लोकार्पण केले. या विहिरीमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ पुढच्या उन्हाळ्यात येणार नाही, असा दावा ग्रुपने केला आहे. चार वर्षांपूर्वी ‘जीवन परिस’ हा ग्रुप स्थापन झाला आहे. सामाजिक कार्याच्या उद्देशाने डोंबिवलीतील सुशिक्षित आणि नोकरी करणारे तरुण या ग्रुपमध्ये एकत्रित आले आहेत. महाराष्ट्रातील चार वर्षांतील कोरड्या दुष्काळाचा, तेथील परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला. ठाणे जिल्ह्याशेजारी असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, मोखाडा परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याचे त्यांना त्यात जाणवले. पाण्याअभावी दरवर्षी उन्हाळ्यात येथील गावपाडे विस्थापित होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोखाडा तालुक्यातील आडोशी गावानजीक असलेल्या चौधरीपाड्यावर १४ घरे विखुरलेली आहेत. त्यात ७५ माणसे राहतात. खडकाळ जमीन आणि डोंगरउतारामुळे पावसाळ्यात सगळे पाणी वाहून जाते. नदीनाल्यांत खड्डे करून ग्रामस्थ उन्हाळ्यात आपली तहान भागवतात. या खड्ड्यांतील पाणीही टिकेल की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे तेथे विहीर बांधण्याचे काम ‘जीवन परिस ग्रुप’ने हाती घेतले. त्यासाठी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे श्रमदान घेतले. लोकवर्गणी गोळा करण्याचे काम ग्रुपने केले. अवघ्या चार लाख रुपये खर्चात त्यांनी मोठी विहीर बांधली आहे. विहिरीच्या शेजारी शोषखड्डा घेण्यात आला आहे. त्यामुळे जमिनीत पाणी मुरेल व विहिरीतील पाण्याची पातळी उन्हाळ्यात आटणार नाही. परिणामी, ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळणार आहे. ही विहीर बांधण्यासाठी कंत्राटदार हबीब शेख यांनी त्यांची सगळी यंत्रसामग्री मोफत दिली होती, तर ५० जणांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.या उपक्रमात ग्रुपच्या वृषाली घाणेकर, मयूर दप्तदार, स्वानंद लेले, ज्योती मार्केंडे, तन्मय गोखले यांनी पुढाकार घेतला होता. विहीर बांधण्यासाठी स्थापत्य सल्लागार म्हणून ऋषिकेश लेले, कायदेशीर माहिती रीतू घरत, मुनिश मल्होत्रा, लक्ष्मण शिंदे यांनी दिली. प्रकल्प साकारत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेण्याचे काम चिन्मया घाणेकर, ऋषिकेश पाठक यांनी केले. तसेच संपूर्ण प्रकल्पावर स्थानिक रहिवासी दिगंबर पाटील यांनी देखरेख ठेवली.पहिलाच प्रयत्न यशस्वी : जीवन परिसचा हा पहिलाच प्रकल्प होता. तो त्यांनी यशस्वी केला. ५० जण एकत्रित आले, तर एका पाड्याची तहान भागू शकतो. त्याचप्रमाणे समाजातील लहानमोठे गट एकत्रित येऊन काम केल्यास राज्यातील जलसंकट दूर होण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास ‘जीवन परिस ग्रुप’ने व्यक्त केला आहे.