शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातच खालावली भूजल पातळी

By admin | Updated: August 11, 2014 00:48 IST

हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात

दुष्काळाची चाहूल : वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊसज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ हमखास पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात वाढणारी भूजल पातळी यंदा मात्र घटत असल्याचे दिसत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील आठ तालुक्यांंची भूजल पातळी ०.६८ ते ०.१६ मीटरने खालावली आहे. यवतमाळ हा हमखास पावसाचा जिल्हा आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ५१२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा पावसाने जिल्ह्यावर अवकृपा केली आहे. १ जून ते १० आॅगस्टपर्यंत ३०३.०२ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ३३.३० टक्के आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या दीडशे टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मे महिन्यात १.७५ मीटर भूजल पातळी होती. परंतु आता ही पातळी खालावत असल्याचे दिसून येते. भूजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी मे महिन्यात भूजल पातळी तपासण्यात येते. मात्र यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शासनाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, महागाव, पुसद, उमरखेड, दारव्हा आणि बाभूळगाव या तालुक्यात भूजल पातळी खालावल्याचे दिसून येते. दारव्हा तालुक्यात सर्वाधिक ०.६८ मीटरने पातळी खालावली आहे. तर महागाव ०.४१, पुसद ०.३६ मीटर अशी पातळी खालावली आहे. विशेष हे कीे, या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या केवळ २५ टक्के पाऊस झाला. त्यामुळेच भूगर्भातील पाण्याची पातळीच वाढली नाही. जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया दिसत आहे. अद्यापही तालुक्यातील पैनगंगा, पूस, वर्धा, अडाण या नद्यांचे पात्र कोरडे आहे.