शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘दिवसा सेनेवर तोंडसुख रात्री मुख्यमंत्र्यांची भेट’

By admin | Updated: July 11, 2017 05:30 IST

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आजकाल दिवसा शिवसेनेवर विनाकारण तोंडसुख घेतात आणि रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर जातात

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आजकाल दिवसा शिवसेनेवर विनाकारण तोंडसुख घेतात आणि रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षावर जातात, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज केली. कदम यांनी पत्र परिषदेत दावा केला की अजित पवार हे साधारणत: महिन्यापूर्वी रात्री एकच्या सुमारास फडणवीस यांना वर्षावर जाऊन भेटले होते. त्या भेटीमध्ये नेमके काय झाले, काही फायली काढल्या की स्वत:च्या बचावासाठी ते गेले होते हे मात्र आपल्याला माहिती नाही. कल्याण-डोंबिवली येथे बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले होते. सेनेची अवस्था गांडुळासारखी झाली असून दुटप्पी राजकारण करत दोन्ही बाजुंनी ढोल वाजवत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर कदम पत्र परिषदेत म्हणाले की, काविळ झाली आहे, त्यांना जग पिवळेच दिसणार. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्याचा लाभ किती शेतकऱ्यांना झाला, याची आकडेवारी मिळविण्यासाठी शिवसेनेने बँकांसमोर ढोलनाद आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी राज्यभरातील बँकांसमोर ढोलनाद केल्याची माहिती कदम यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बँकांकडून मिळणारी आकडेवारी आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आकडेवारी तपासून पाहणार.