शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 01:21 IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त विविध संघटनांमार्फत सारसबाग येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त विविध संघटनांमार्फत सारसबाग येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तही कार्यक्रम घेण्यात आले.विश्व हिंदू परिषदेतर्फे महानगरमंत्री किशोर चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केला. सामाजिक समरसता मंचप्रमुख ज्ञानेश्वर इंगळे, पर्वती भागाचे जिल्हामंत्री केतन घोगरे, संजय हसेजा उपस्थित होते.रिपब्लिकन सेनेतर्फे कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष अमर पंडागळे यांच्या हस्ते किष्किंधानगर व कोथरूड परिसरात लहान मुलांना खाऊवाटप करण्यात आले. विशाल सरवदे, अक्षय ननावरे, अभिजित राऊत, उमेश सावंत उपस्थित होते.लहुजी सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ६५ जणांनी रक्तदान केले. नगरसेवक दीपक मानकर, किशोर विटेकर, लहुजी शक्तिसेनेचे संस्थापक-अध्यक्ष विष्णू कसबे, प्रतीक खंडागळे, सूरज वाघमारे, शिवाजी क्षीरसागर उपस्थित होते.बजरंगी मोरया प्रतिष्ठान व युनिव्हर्सल ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक सनमितसिंग चौधरी, सुरेश उकीरडे, गणेश अडागळे उपस्थित होते.दलित पँथरच्या वतीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी पुष्पहार अपर्ण केला. संघटनेचे शहराध्यक्ष प्रकाश साळवे यांनी ‘फकिरा’ या कादंबरीचे वाटप केले. विशाल खिलारे, विलास गायकवाड, हुसेन शेख उपस्थित होते.भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे व शहराध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केला. वसंत साळवे, अनिल गायकवाड या वेळी उपस्थित होते.पुणे नवनिर्माण सेवाच्या वतीने शहराध्यक्ष अजय पैठणकर यांनी पुष्पहार अर्पण केला. अरुण गुजर, अनंता लांडगे, किसन भुवड या वेळी उपस्थित होते.शहर काँग्रेस मानव अधिकार विभागाच्या वतीने विभागाचे अध्यक्ष रामदास मारणे यांनी पुष्पहार अर्पण केला. नीलेश बोराटे, सचिन सावंत, रमेश अय्यर, युवक अध्यक्ष विकास लांडगे या वेळी उपस्थित होते.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पुष्पहार अर्पण केला. माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, रजनी त्रिभुवन, लता राजगुरू, लक्ष्मी घोडके उपस्थित होत्या.राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या वतीने अ‍ॅड. फय्याज शेख यांनी पुष्पहार अर्पण के ला. मनोहर गाडेकर, योगेश मारणे, स्वप्निल सावंत या वेळी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अ‍ॅड. शाबीर खान यांनी पुष्पहार अर्पण केला. बाळासाहेब बहुले, अनिल नेहुलकर, जाकीर खान, प्रमोद डिंबळे, गणेश पवार या वेळी उपस्थित होते.भीमशक्ती संघटनेच्या वतीने शहराध्यक्ष शिलार रतनगिरी यांनी पुष्पहार अर्पण केला. राजू गायगवळी, हरीश खिलारे, सतीश गायकवाड, गुलाबराव ओव्हाळ, योगेश बोर्डे उपस्थित होते.जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादनजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपायुक्त कविता द्विवेदी, दीपक नलवडे, नीलेश सगर, संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, प्रांताधिकारी स्नेहल बर्गे तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.>कन्या प्रशालेत कार्यक्रमभारती विद्यापीठ कन्या प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापिका डॉ. पी. ए. दीक्षित यांनी प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी टिळक व साठे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. व्ही. के. पाटील यांनी अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी माहिती दिली. व्ही. एन. पवार, एस. एस. शेडगे यांनी नियोजन केले. सी. के. भालचिम यांनी सूत्रसंचालन केले.>नवीन मराठी शाळेत बालसभा पुणे : नवीन मराठी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यानिमित्त शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थ्यांनीच पाहिले. अध्यक्ष म्हणून चौथीच्या शिवनेरी वर्गातील दर्शिल भन्साळी हा विद्यार्थी, तर लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत आर्यन रोंघे हा विद्यार्थी आला होता. सभेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी टिळक व साठे यांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. मुख्याध्यापिका कल्पना वाघ, दर्शिल भन्साळी, ज्येष्ठ शिक्षिका तनुजा तिकोने यांनी प्रतिमांचे पूजन केले. सभेचे स्वागत व प्रास्ताविक कल्पना वाघ यांनी केले. >बावधनमध्ये महापुरुषांना अभिवादनकर्वेनगर : बावधनमध्ये बावधन शाखेच्या भाजपा अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या वतीने संतशिरोमणी सावतामाळी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोरख रावसाहेब दगडे यांनी महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख केला. सुनील तांबे, वैभव मुरकुटे यांची भाषणे झाली. मुळशी तालुका विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य मयूर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. दिगंबर लालसरे यांनी आभार माले.>देशी रोपांचे वाटपदि स्मरण फाउंडेशनच्या वतीने सारसबाग परिसरातील पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी फाउंडेशनतर्फे अण्णा भाऊ साठे यांच्या अनुयायांना ९६ देशी वृक्षांचे वाटप करण्यात आले.या वेळी दि स्मरण सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष राहुल जावडेकर, संकेत सुरत्राण, अ‍ॅड. विवेक सिद, अ‍ॅड. ओंकार चव्हाण, संग्राम मोरे, सुधीर पवार, संजय शेंडगे, संतोष पाटोळे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.>पुस्तक प्रदर्शनाने आदरांजलीलाकूड बाजारातील महात्मा फुले प्रतिष्ठानच्या ग्रंथालय विभागातर्फे अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. उपक्रमाची सुरूवात पथारी संघटनेच्या कार्यकर्त्या पूनम परदेशी यांनी अण्णा भाऊ साठे समग्र वाङ्मयास पुषपहार अर्पण करून केली. या वेळी ग्रंथपाल माधव घोटमुकले, रिक्षा पतसंस्थेचे व्यवस्थापक विजयानंद रांजणे, राहुल नागावकर, टेम्पो पंचायतीचे सरचिटणीस संपत सुकाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. >भारतरत्न देण्याची मागणीअण्णा भाऊ साठे यांना केंद्र शासनाकडून भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे करण्यात आली. अण्णा भाऊ साठे यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त एम. डी. शेवाळे यांनी ही मागणी केली. या वेळी अध्यक्षस्थानी पक्षाच्या मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे होते. अण्णा भाऊ साठे यांनी दु:खी, कष्टकरी समाजासाठी मोठे काम केले असल्याने त्यांना या सन्मानाने पुरस्कृत करण्यात यावे.>बिबवेवाडीत कार्यक्रमलोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धनकवडीतील राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांगडे, अर्जुनराव गरुड, शिवदीप उंद्रे, लोकेश मांगडे, प्रा. जितेंद्र देवकर, तानाजी मागंडे आदी उपस्थित होते.