शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्ड प्ले’ला हिरवा कंदील

By admin | Updated: November 18, 2016 07:20 IST

वांद्रे-कुर्ला संकुलात १९ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या ब्रिटिश रॉक बँडच्या ‘कोल्ड प्ले’ला गुरुवारी उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला.

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलात १९ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या ब्रिटिश रॉक बँडच्या ‘कोल्ड प्ले’ला गुरुवारी उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. मात्र, भविष्यात याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली, तर मनोरंजन कर भरावा लागेल, असे स्पष्ट करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आयोजकांकडून तसे हमीपत्र घेण्याचे निर्देश दिले.‘कोल्ड प्ले’ला मनोरंजन कर लागू न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला, सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे व अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकेनुसार, बॉम्बे एन्टरटेन्मेंट ड्युटी अ‍ॅक्ट, १९२३ नुसार शैक्षणिक किंवा मदतीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाच मनोरंजन करातून सवलत मिळू शकते. मात्र, ‘कोल्ड प्ले’ हा पूर्णपणे व्यावसायिक कार्यक्रम आहे. त्यामुळे हा कार्यक्रमाला दिलेली सवलत रद्द करण्यात यावी. त्यावर हंगामी महाअधिवक्ते रोहित देव यांनी या कार्यक्रमाचा उद्देश केवळ रॉक शो नसून, अन्यही संकल्पना या कार्यक्रमाद्वारे पुढे आणण्यात येतील, असे खंडपीठाला सांगितले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी केलेल्या मागणीवर आत्ता निर्णय दिला जाऊ शकत नाही, असे म्हणत या कार्यक्रमाला परवानगी दिली. ‘राज्य सरकारची भूमिका लक्षात घेतली, तरी जनहितासाठी ही याचिका निकाली काढता येऊ शकणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून आयोजकांना मनोरंजन कराबाबत हमीपत्र देण्यास सांगा,’ असे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले. या कार्यक्रमाचे आयोजक दिल्लीतील असल्याने, जर भविष्यात न्यायालयाने मनोरंजन कर भरण्याचा आदेश दिला, तर तो भरण्यात येईलच याची खात्री नाही, अशी भीती याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी १९९६ मध्ये आयोजित केलेल्या मायकल जॅक्सनच्या शोचे उदाहरण खंडपीठाला दिले. त्यावर खंडपीठाने म्हटले की, सरकारच्या सगळ्या कृतीकडे संशयाने बघू नका. आम्ही सरकारच्या सर्व निर्णयांवर संशय घेऊ शकत नाही.याशिवाय एमएमआरडीएनेही या कार्यक्रमासाठी मैदान देताना भाड्यात २५ टक्के सवलत दिली. एमएमआरडीएच्या याही निर्णयाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. मात्र, उच्च न्यायालयाने भाड्यात सवलत द्यायची की नाही, याचा अधिकार एमएआरडीएला असल्याने, आपण त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)