शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाअभावी वाळलेल्या फळबागेचा अंत्यविधी!

By admin | Updated: May 30, 2016 04:37 IST

वाळलेल्या फळबागांमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम करण्याचे ठरविले असून त्यांच्या पत्रिका अधिकाऱ्यांना वाटल्या आहेत.

वाशिम : शासकीय अनुदानाअभावी वाळलेल्या फळबागांमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम करण्याचे ठरविले असून त्यांच्या पत्रिका अधिकाऱ्यांना वाटल्या आहेत. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना फळबाग व पीक विम्यासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय निसर्गही कोपल्यामुळे फळबाग वाळून गेली. त्यामुळे फळझाडे उखडून त्यांचा अंत्यविधी कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सुशिला देवढे यांनी सांगितले. निमंत्रण पत्रिका छापून त्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील सुशिला सुभाषराव देवढे, शालीकराम विश्वनाथ लादे, भवानी भाऊराव पोफळे व योगेश बाबाराव देवढे यांनी शेतामध्ये सहा वर्षांपूर्वी संत्रा, डाळिंब व आंबा यासारख्या फळपिकांची लागवड केली. दरम्यानच्या कालावधीत अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत, उसनवारी, कर्ज काढून फळबागांचे संगोपन केले. पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्तीमुळे झाडांचे संगोपन करणे कठीण बनलेल्या शेतकऱ्यांनी फळबाग पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविले मात्र शासकीय नियमातील आडकाठीमुळे दुबळवेल गावाचा समावेश असलेले मंडळ विम्यासाठी पात्र ठरले नाही. फळबाग पीक विमा लागू होण्यासाठी मंडळात किमान २० हेक्टर शेतजमिनीवर फळबाग लागवड असणे शासकीय नियमानुसार गरजेचे आहे. प्रत्यक्षात किन्हीराजा मंडळात ३९ हेक्टर एवढी फळबाग आहे, मात्र विभागाने फळबागेचे क्षेत्र कमी दाखविल्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. २०१६ पासून फळ पीक विमा लागू होईल, असे कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांना कळविले आहे. (प्रतिनिधी)प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिरंगाईप्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना फळबाग व पीक विम्यासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.