शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

थोर स्वातंत्र्यसैनिक भि.दा.भिलारे गुरुजींचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:40 IST

महात्मा गांधींवर झालेला खुनी हल्ला परतवून लावणारे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार भिकू दाजी भिलारे ऊर्फ भि. दा. भिलारे गुरुजी यांचे (वय ९८) बुधवारी पहाटे

- लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी (जि. सातारा) : महात्मा गांधींवर झालेला खुनी हल्ला परतवून लावणारे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार भिकू दाजी भिलारे ऊर्फ भि. दा. भिलारे गुरुजी यांचे (वय ९८) बुधवारी पहाटे तीन वाजता मुुंबई येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. भिलार (ता. महाबळेश्वर) या त्यांच्या मूळ गावी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, पाच मुली, सुना ,पुतणे, नातवडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.२६ नोव्हेंबर १९१९ रोजी भिलार येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भि. दा. भिलारे गुरुजी यांनी दुर्गम महाबळेश्वर परिसरात सामाजिक जीवनाचा श्रीगणेशा केला. सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी विद्यादानाच्या कार्यात झोकून दिले. महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, आबासाहेब वीर यांचे ते विश्वासू सहकारी होते. महाबळेश्वर, वाई व जावळी तालुक्यांतील ९३ गावांचा ग्रामोन्नती संघ स्थापन करून अनिष्ठ रुढी, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. गुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी हे महाबळेश्वर येथे आले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते सक्रिय सभासद होते. जिल्हाध्यक्षपदाची धुराही त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. १९६२ ते १९७२ या कालावधीत ते जावळी मतदारसंघाचे आमदार होते. १९७८ ते १९८० दरम्यान विधानपरिषदेचे सदस्य होते. सातारा जिल्ह्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महात्मा गांधींच्या हत्येचा कट उधळला१९४४ मध्ये महात्मा गांधी पाचगणीत आले होते. त्यावेळी प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधीजींवर केलेला खुनी हल्ला परतवण्यात भिलारे गुरुजी आघाडीवर होते. हल्ल््यासाठी पुढे आलेल्या व्यक्तीच्या हातातील सुरा गुरुजींनी हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला होता.