शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी ‘अन्नत्याग’

By admin | Updated: August 5, 2016 05:25 IST

विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळावे, म्हणून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांच्या कृती समितीने गुरुवारी आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन केले.

मुंबई : राज्यातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळावे, म्हणून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांच्या कृती समितीने गुरुवारी आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन केले. वरिष्ठ कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील ‘कायम’ हा शब्द वगळून १०० टक्के अनुदान देण्याची कृती समितीची मागणी आहे.राज्यातील सर्व सहसंचालक, कार्यालयांसमोर अनुदानाच्या मागणीसाठी समितीने ११ जुलै रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारविरोधात अन्नत्याग आंदोलन करावे लागले, अशी प्रतिक्रिया कृती समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक धोटे यांनी दिली. ते म्हणाले की, कृती समितीने वारंवार सरकारला निवेदन दिले आहे. सरकार समितीच्या मागण्यांची दखल घेत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. याशिवाय शासन निर्देशानुसार विद्यापीठाने श्रेणी देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशी घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाविद्यालयांतील सोयी-सुविधा तपासण्यासाठी सरकारने नेमलेल्या समित्यांचा अहवाल तत्काळ प्रसिद्ध करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यापीठामार्फत आकारण्यात येणाऱ्या शुल्काची प्रतिपूर्ती सरकारने करावी, विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा वेळेवर करावा, विकास अनुदान देण्याची व्यवस्था अंमलात आणावी, अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कृती समितीने शासनाला साकडे घातले आहे. (प्रतिनिधी)