शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेखालेखक हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 05:10 IST

व्यंगचित्राला साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे शनिवारी सायंकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

मुंबई : व्यंगचित्राला साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे शनिवारी सायंकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा आणि नातू असा परिवार आहे.सरवटे यांचा जन्म १९२७ साली कोल्हापूर येथे झाला. पुण्याच्या इंजिनीअरिंग महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर सिमेंट कंपनीत त्यांनी अनेक वर्षे इंजिनीअर म्हणून काम केले. परंतु व्यंगचित्राकडे त्यांचा अधिक कल होता. पु. ल. देशपांडे, श्री. दा. पानवलकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी आणि रमेश मंंत्री यांच्या मराठी पुस्तकांवरील मुखपृष्ठे सरवटे यांनी रेखाटली होती. गेल्या ४० वर्षांपासून ललित मासिकात व्यंगचित्रे काढण्याचे काम त्यांनी केले. ज्येष्ठ विनोदी लेखक जयवंत दळवी यांच्या ‘ठणठणपाळ’ या मराठीतल्या खुशखुशीत साहित्यकृतीला व्यंगचित्राची जोड देण्याचे काम सरवटे यांनी केले. ‘खडा मारायचा झाला तर!’, ‘सावधान पुढे वळण आहे’,‘खेळ रेषावतारी’, ‘खेळ चालू राहिला पाहिजे!’ या व्यंगचित्रसंग्रहातून त्यांनी काढलेली व्यंगचित्रे अधिक गाजली. सरवटे यांच्या तीन संग्रहांना राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले आहे. त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ कार्टुनिस्ट जीवनगौरव पुरस्कार, सह्याद्रीचा ‘कलारत्न’ पुरस्कार आणि कार्टुनिस्ट कंबाइन संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)अभियांत्रिकी व्यंगचित्रकार हरपलाकेवळ व्यंगचित्रकार नव्हे तर व्यंगचित्रकलेचे अभ्यासक असणारी व्यक्ती म्हणजे वसंत सरवटे असे म्हणता येईल. व्यंगचित्रात तुटक रेषेने स्वत:ची एक वेगळी शैली निर्माण करत व्यंगचित्रकारांमध्ये अढळ स्थान सरवटे यांनी निर्माण केले होते. त्यांच्या व्यंगचित्रातून अभियांत्रिकी बुद्धिमत्ता दिसून येत होती. साहित्य वर्तुळात वावरणारा व्यंगचित्रकार अशी त्यांची ख्याती होती. खऱ्या अर्थाने व्यंगचित्रकार म्हणून जगलेल्या अभियांत्रिकी व्यंगचित्रकाराला श्रद्धांजली.- विवेक मेहेत्रे, ज्येष्ठ व्यंगचित्रकारमुखपृष्ठे लोकप्रिय केलीसरवटे यांच्या प्रयत्नामुळे व्यंगचित्राला पुरस्कार प्राप्त झाले. माझ्या अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनी रेखाटली आहेत. अर्थचक्र हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला. त्यांच्या निधनामुळे या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.- राजेंद्र मंत्री, प्रकाशकयोगदानामुळे व्यंगचित्रांना चांगले दिवसव्यंगचित्र हे केवळ पानपूरक म्हणून वापरले जात होते. परंतु सरवटे यांनी व्यंगचित्राला साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचे काम केले. त्यांच्या या योगदानामुळे व्यंगचित्राला चांगले दिवस आले.- विकास सबनीस, व्यंगचित्रकार मदतनीस हरपलानिर्जीव वस्तूतून व्यंगचित्र निर्माण करण्याचे काम सरवटे यांनी केले. व्यंगचित्रांचा त्यांचा अभ्यास उत्तम होता. त्यातून होणारी विनोद निर्मिती ही अत्यंत मार्मिक होती. व्यंगचित्रासोबतच माणूस म्हणून सरवटे यांनी नेहमीच साऱ्यांना मदत केली. त्यांच्या जाण्याने एक मदतनीस हरपला आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी व्यक्त केली.