शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धिंड काढल्याने आजीने मुलांना कोंडले

By admin | Updated: May 23, 2017 01:50 IST

चकली चोरून खाल्ल्याच्या आरोपावरून विवस्त्र धिंड काढल्याने घाबरलेली मुले जेव्हा पळतपळत घरी आली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : चकली चोरून खाल्ल्याच्या आरोपावरून विवस्त्र धिंड काढल्याने घाबरलेली मुले जेव्हा पळतपळत घरी आली, तेव्हा ती खूप घाबरलेली होती. त्यांची अवस्था पाहून त्यांच्या आज्जीही घाबरल्या आणि पुन्हा कोणी मारायला येईल या भीतीपोटी त्यांनी त्याच अवस्थेत मुलांना कोंडून ठेवल्याची माहिती पुढे आली. या दोन्ही मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे आणि त्यांच्या आया धुण्या-भांड्याचे काम करून कुटुंबाचे पोट भरतात. त्या जेव्हा घरी आल्या, तेव्हा त्यांनी या मुलांची सुटका केली... मारहाण करून विवस्त्र धिंड काढल्याने मुले भेदरलेली होती. त्यातच त्यांचे केस अर्धवट अवस्थेत कापलेले होते. त्यामुळे तशा अवस्थेतच ती पळतपळत आपापल्या घरी आली. दोन्ही मुलांची आजी घरी असते. त्यांना मुलांची ही अवस्था पाहून धक्काच बसला. रडतरडत जेव्हा मुलांनी घडला प्रकार सांगितला, तेव्हा त्याही घाबरल्या. मुलांना मारण्यासाठी पुन्हा कोणीतरी येईल, या भीतीने त्यांनी आपापल्या घरात या मुलांना कोंडून ठेवले. त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल दुकानदाराची माफीही मागितली. दोन्ही मुलांना वडील नाहीत. त्यांच्या आयाच धुणी-भांडी करून त्यांचा सांभाळ करतात. या कामासाठी त्या मुंबईला जातात. तेथून जेव्हा त्या घरी परतल्या, तेव्हा त्यांनाही हा प्रकार समजल्याने धक्का बसला. त्यांनीच कोंडलेल्या घरातून मुलांची सुटका केली. त्यांचे अर्धवट कापलेले केस आणि भेदरलेली अवस्था पाहून त्यांचेही डोळे भरून आले. आधी त्यांनी दुकानात नेऊन मुलांचे सर्व केस काढून टाकले. तोवर परिसरात मोठी गर्दी झाली. मुलांची, त्यांची आज्जी आणि आईची अवस्था पाहून लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला. गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढल्याचा व्हिडीओही तोवर व्हायरल झाला होता. तो पाहून काही जण गोळा झाले. ही मुले नागसेन मराठी शाळेत शिकतात. सध्या शाळेला सुटी आहे. त्यामुळे ती मित्रांसोबत खेळत होती आणि तेव्हाच त्यांच्यावर चोरीचा आळ आला. जेव्हा मुलांचे केस अर्धवट कापून, गळ््यात चपलांचा हार घालत त्यांची धिंड काढण्याचा प्रयत्न दुकानदाराने- त्यांच्या मुलांनी सुरू केला, तेव्हा त्याला काही जणांनी हटकले. त्यावर ‘दोनो बच्चोंने दुकान में चोरी की है. आप बीच में मत आयो,’ असा दम त्यांना भरला. साधारण दीड तास सगळा प्रकार सुरू होता. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही मध्ये पडले नाहीत. शिवाय दुकानदाराच्या मुलांविरूद्ध आधीच मारहाणीचे गुन्हे असल्याने काही जण घाबरले. रात्रीपर्यंत फेसबुक, यू ट्यूबवर व्हिडीओ फिरत होता. तो पाहिल्यावर संतापलेल्या नागरिकांनी कुटुंबासह हिललाईन पोलीस ठाणे गाठले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे यांना सर्व प्रकार सांगितला. व्हिडीओ क्लिप दाखवली. घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी मारहाण, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि रात्रीच तिघांनाही अटक केली. घटनेला दोन दिवस उलटूनही परिसरातील तणाव निवळलेला नाही. त्यामुले पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.