शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदी विशाल वाळुंज

By admin | Updated: July 22, 2016 01:38 IST

तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी सत्तारूढ शहर विकास समितीचे विशाल वाळुंज विजयी झाले.

तळेगाव दाभाडे : तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी सत्तारूढ शहर विकास समितीचे विशाल वाळुंज विजयी झाले. शिवसेनेचे सुनील ऊर्फ मुन्ना मोरे यांचा चार मतांनी पराभव झाला. दिनेश शहा यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.नगर परिषद सभागृहात उपसभापदी विलास टकले यांच्या अध्यक्षतेखाली सभापतिपदासाठी निवडणूक झाली. वाळुंज व मोरे यांच्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. या वेळी वाळुंज यांना अपेक्षेप्रमाणे सात, तर मोरे यांना तीन मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी विलास टकले यांनी वाळुंज निवडून आल्याचे जाहीर केले. प्रशासन अधिकारी लक्ष्मण गुळवे यांनी निवडणूक प्रक्रियेत साहाय्य केले. त्यानंतर शहर विकास समितीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, नगराध्यक्षा शालिनी खळदे, ज्येष्ठ नेते मुकुंदराव खळदे, नगरसेवक गणेश काकडे, चंद्रभान खळदे, माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, मावळते सभापती दिनेश शहा आदींची अभिनंदनपर भाषणे झाली. सत्यशीलराजे दाभाडे सरकार, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप ढमाले, ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे यांच्यासह शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती वाळुंज यांनी आभार मानले. (वार्ताहर)>माजी सभापती राजेंद्र दाभाडे व ब्रिजेंद्र किल्लावाला यांनी सुनील मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवडणुकीबाबत विनंती केली. मागील पाच वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक वेळी सभापती व उपसभापतिपद बिनविरोध देऊन विरोधी पक्षाने सहकार्यच केल्याचे सुनील मोरे व सतीश राऊत यांनी सांगितले. या बदल्यात शहर विकास समितीने शेवटच्या वर्षी उपसभापतिपद विरोधी पक्षाला देण्याचा शब्द न पाळल्याने उमेदवारी मागे घेण्याबाबत सुनील मोरे , सतीश राऊत, संजय सोनवणे यांनी नकारघंटा वाजवली.