शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पॅरोलसाठी ‘आजोबा’ही जवळचे नातेवाईक

By admin | Updated: November 25, 2014 01:37 IST

मुंबई (पॅरोल अॅण्ड फरलो) नियम-1959मधील नियम 19मध्ये उल्लेख नसला तरी आजोबांचाही जवळच्या नातेवाइकांत समावेश होत असल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे.

नागपूर : मुंबई (पॅरोल अॅण्ड फरलो) नियम-1959मधील नियम 19मध्ये उल्लेख नसला तरी आजोबांचाही जवळच्या नातेवाइकांत समावेश होत असल्याचा खुलासा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला आहे. 
संबंधित नियमांत केलेली व्याख्या र्सवकष नसून उदाहरणात्मक असल्याचे तसेच जवळच्या नातेवाइकांमध्ये उल्लेखीत नात्यांना र्निबधात्मक अर्थाने पाहता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने ‘मोहम्मद वसीम वि. महाराष्ट्र शासन’ प्रकरणावरील निर्णयात आजी जवळची नातेवाईक असल्याचे नमूद केले होते.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगत असलेला कैदी रमेश दामोदर घागरेच्या आजोबांचे 11 नोव्हेंबर रोजी निधन झाले. यामुळे त्याने पॅरोल मिळण्यासाठी अर्ज केला होता. विभागीय आयुक्तांनी 12 नोव्हेंबर रोजी अर्ज फेटाळून लावला. 23 मार्च 2क्13 रोजी पॅरोलवर सोडले असता घागरेला अटक करावी लागली होती. पॅरोल मुदत संपल्यापासून तो 15क् दिवस फरार होता. तसेच, नियम 19 मध्ये उल्लेखीत नातेवाइकांत ‘आजोबां’चा समावेश नाही अशी दोन कारणो पॅरोल नाकारताना देण्यात आली होती. या निर्णयाला घागरेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. वडील 3क् वर्षापासून बेपत्ता असल्यामुळे त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी पॅरोलवर सोडण्याची विनंती घागरेने केली होती. यावर निर्णय देताना न्यायालयाने वरील खुलासा करून घागरेला 15 दिवसांचा पॅरोल मंजूर केला. त्यासाठी प्रत्येकी 1क् हजारांचे दोन जामीनदार देण्याची अट ठेवली. जामीनदार याचिकाकत्र्याच्या जवळचे नातेवाईक असावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
 
काय म्हणतो नियम 19
वडील, आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुले गंभीर आजारी असतील किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल, भाऊ, बहीण व मुलांचे लग्न असेल, महिला  कैद्याचे बाळंतपण असेल, घर कोसळणो, पूर, आग व भूकंप अशी नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल अशा परिस्थितीत संबंधित कैद्याला एकावेळी 3क् दिवसांच्या पॅरोलवर सोडता येईल.