शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत

By admin | Updated: June 17, 2017 19:48 IST

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतील इनामदारवाड्यातून सकाळी प्रस्तान झाले. चिंचोली देहूरोड येथून पालखी निगडीच्या दिशेने मार्गस्त झाली.

 ऑनलाइन लोकमत

पिंपरी-चिंचवड, दि. 17 -  संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतील इनामदारवाड्यातून सकाळी प्रस्तान झाले. चिंचोली देहूरोड येथून पालखी निगडीच्या दिशेने मार्गस्त झाली. सायंकाळी पाच वाजता पालखीचे निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेतर्फे स्वागत करण्यात आले. 
 
शहरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे टाळ मृदंगाच्या गजर करीत व तुकोंबाच्या जयघोषात निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या हस्ते दिंडी प्रमुखांना ताडपत्रीची भेट देण्यात आली. दरम्यान वारकरी टाळमृदंगात तल्लीन होऊन पंढरपुरच्या दिशेने उद्या पहाटे मार्गक्रमन करणार आहेत. 
 
पंढरीची वारी हा अवघ्या महाराष्ट्राचा आनंदसोहळा आहे. विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या या संत मांदियाळीची सेवा करण्याची संधी पालखी मार्गावरील गावांमधील भाविकांना मिळणार आहे. "साधू संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।। या भावनेतून पिंपरी-चिंचवडकर वारकऱ्यांची सेवा करणार आहेत. यंदा पालखीबरोबर पावसाचे आगमन झाल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह  दिसून येत आहे. 
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठलरुख्मीनी मंदीरात होणार आहे. निगडी आकुर्डीतील नागरिकांनी पालखीचे स्वागत केले.