शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत वुमेन समिटचे भव्य दिव्य उद्घाटन

By admin | Updated: March 20, 2017 14:13 IST

'अस्तित्व तिच्या नजरेतून' ही संकल्पना घेऊन लोकमत माध्यम समूहाच्या पुढाकाराने एनईसीसी, युनिसेफ आणि युएन वूमेन यांच्या सहयोगाने 'लोकमत वुमेन समिट'चे सहावे पर्व सोमवारी रंगले.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 20 - 'अस्तित्व तिच्या नजरेतून' ही संकल्पना घेऊन लोकमत माध्यम समूहाच्या पुढाकाराने एनईसीसी, युनिसेफ आणि युएन वूमेन यांच्या सहयोगाने 'लोकमत वुमेन समिट'चे सहावे पर्व सोमवारी रंगले. यावेळी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा, राजेश्वरी चंद्रशेखर, युनिसेफच्या अ‍ॅडव्होकसी व कम्युनिकेशनप्रमुख अलेक्झांड्रा वेस्टरबिक, कुस्तीपटू गीता फोगट,  व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डिझाईन प्रमुख देविता सराफ, यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, सानिया सेठ, हिता अजमेरा, राजकीय समालोचक नीरजा चौधरी, विजय बाविस्कर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 
 
यावेळी अलेक्झांड्रा वेस्टरबिक म्हणाल्या की, 'समाजमनाला आणि विचारांना मूर्त रुप देण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारे प्रश्न समोर आणण्याची भूमिका माध्यमे पार पाडतात. सध्या सुमारे 15 अब्ज बालके कुपोषणाने पीडित आहेत. कुपोषणामुळे होणाऱ्या बालकमृत्यूचे प्रमाण मोठे आहे. बालकांचे अनारोग्य, सकस आहाराचा अभाव, शिक्षणाचा अभाव हे प्रश्न युनिसेफने हिरीरीने मांडले आहेत. भारत सरकारच्या सहयोगाने येथेही आरोग्य, आहार, शिक्षण याबाबत काम केले जाते. कुपोषणाची समस्या हद्दपार केल्याशिवाय भारताचा सर्वांगीण विकास होणार नाही. मुलांचे योग्य पोषण झाल्यास कुटुंबे आणि समाजही सुदृढ होतो. त्यासाठी तळागाळात जाऊन जनजागृती होणे महत्वाचे आहे. बालकांच्या पोषणावर करण्यात येणारा खर्च ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. बालविवाहाला आळा, कुमारवयातील गर्भधारणा, प्रत्येक बालकाला सकस आहार आणि पोषणमूल्ये मिळणे ही सध्याची महत्वाची उद्दिष्ट्ये असायला हवीत'.
(लोकमत वुमेन समिटमध्ये आज उलगडणार ‘अस्तित्व ‘ती’च्या नजरेतून)
दरम्यान,  महिला चळवळीकडे महिलांच्या नजरेतून पाहत पुढील मार्गाची दिशा ठरविण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. लोकमत सखी मंचाच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ महाराष्ट्रातील तळागाळात पोहोचली आहे. या चळवळीचेच राष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या लोकमत वुमेन समिटशी आता महिलांच्या प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या युनिसेफ आणि यूएन वुमेन (संयुक्त राष्ट्रसंघाची महिला शाखा) या संस्थाही जोडल्या गेल्या आहेत. लोकमत सखी मंचने आतापर्यंत महिलांच्या मूलभूत प्रश्नांवर मूलगामी काम केले आहे.