शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे ग्राम मिशन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 04:59 IST

उद्योगपती रतन टाटा, महानायक अमिताभ बच्चन आणि काही नामवंत उद्योगपतींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेऊन जाहीर केलेल्या ग्राम संपूर्ण परिवर्तन मिशनची चार महिने

यदु जोशी, मुंबईउद्योगपती रतन टाटा, महानायक अमिताभ बच्चन आणि काही नामवंत उद्योगपतींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक घेऊन जाहीर केलेल्या ग्राम संपूर्ण परिवर्तन मिशनची चार महिने उलटले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. एक हजार गावांच्या विकासाची योजना वाऱ्यावर सोडल्यात जमा आहे.कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडातून एक हजार गावांचा आमूलाग्र विकास करण्यासाठीचे हे मिशन, २५ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केली होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मिशन कौन्सिलची स्थापना करण्यात येणार होती, ती अद्याप झालेली नाही. सरकार आणि खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली कंपनी स्थापन करण्यात येणार होती, तीदेखील झालेली नाही. मिशनची अंमलबजावणी ग्रामविकास विभागामार्फत केली जाणार आहे. या मिशनच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मिशन कौन्सिलची स्थापना करण्यात येणार होती. त्याचाही मसुदा ग्रामविकास विभागाकडे महिनाभरापासून पडलेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या योजनेमध्ये आधी एक हजार खेडी घेण्यात येणार होती. मात्र, विविध कंपन्यांकडून तब्बल १५०० गावांच्या विकासाचे प्रस्ताव आले. २५ आॅगस्टच्या पहिल्या बैठकीत बडे उद्योगपतीच आलेले होते. त्यानंतर अनेक कंपन्या, बँकांनी मिशनमध्ये सहभागाची तयारी दर्शविल्याने, एक हजार गावांची यादी दीड हजारावर गेली. मात्र, ग्रामविकास विभागातील विशिष्ट अधिकारी पहिल्या टप्प्यात एक हजारच खेडी घेणार यावर अडून बसले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अतिरिक्त पाचशे गावांचा विकास पहिल्या टप्प्यात होण्याबाबत साशंकता आहे, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा मिशनला फटका बसू शकतो. ग्रामविकासाचे हे मिशन आधी १०० गावांमध्ये २ आॅक्टोबरपासून सुरू होईल असेही जाहीर केले होते. तथापि, तेदेखील झालेले नाही. ग्रामविकास विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने, मुख्यमंत्र्यांच्या मिशनला पंकजा मुंडे यांचे खाते कोलदांडा घालत असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. यासाठी पन्नास टक्के निधी हा राज्य शासन देईल, असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, तशी तरतूद करण्यात नाही. मिशनच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावात एक तरुण/तरुणीला मानधनावर नेमण्यासाठी अर्ज मागविले आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मुलाखती घेऊन निवड होणार आहे.