शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाेत्कृष्ट आमदारांचा ‘लोकमत’ करणार गौरव

By admin | Updated: July 28, 2016 13:39 IST

‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. ही घोषणा लोकमत

- विधिमंडळ पुरस्कार देणारे ‘लोकमत’ पहिले वृत्तपत्र मुंबई : ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. ही घोषणा लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा यांनी येथे केली. असे पुरस्कार देणारे ‘लोकमत’ हे पहिले वृत्तपत्र आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात येत आहे. संसदीय कार्याच्या माध्यमातून देशाचे, समाजाचे कल्याण आणि जनतेच्या आशा-आकांक्षांना वास्तवात आणण्याचे काम होते. संसद आणि विधिमंडळाने लोककल्याणाचे मार्ग प्रशस्त करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे करण्याचे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काळात संसद असो की, देशभरातील विधिमंडळे, यात विविध अंगाने चर्चा, सकस वादविवाद न होता सभागृह बंद पाडणे, चर्चा न होणे व गोंधळात विधेयके मंजूर करून घेणे, असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. समाजधुरिणांना, विचारवंतांना जशी याविषयी काळजी आहे तसेच कोट्यवधी जनतेला अपेक्षाभंगाचे दु:ख आहे. कारण सुसह्य जीवन जगण्यासाठी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जनतेला याच सभागृहांकडून अपेक्षा आहेत. बेचैन असलेल्या तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे.पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार दि. ३ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. (प्रतिनिधी)मान्यवरांचे ज्युरी मंडळ - पुरस्कारांसाठी ज्युरी मंडळ स्थापन करण्यात आले असून, त्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आणि ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर या मान्यवरांचा समावेश आहे.- ज्युरी मंडळ विधिमंडळात जनतेच्या आशा-आकांक्षांची परिपूर्ती करणाऱ्या आदर्श प्रतिनिधींची ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ यासाठी निवड करणार असून, लवकरच ज्युरी मंडळाची बैठक होईल.