शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांमध्ये देणार ग्रामविकास मंत्र्यांचा संदेश!

By admin | Updated: January 25, 2016 02:04 IST

जिल्हा परिषदांनी पाठविली सरपंचांना पत्र

संतोष येलकर/अकोला: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतींमध्ये होणार्‍या ग्रामसभांमध्ये ग्रामविकास मंत्र्यांचा संदेश वाचून दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंचांना लिहिलेले संदेश पत्र जिल्हा परिषदेमार्फत सरपंचांना पाठविण्यात आली आहेत. २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने पंचायत राज व्यवस्थेतील पायाभूत संस्थेचे प्रमुख व प्रथम नागरिक म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायातींच्या सरपंचांना लिहिलेल्या पत्राचे ग्रामसभांमध्ये वाचन करण्यात येणार आहे. या पत्रात ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेला संदेश ग्रामसभांमध्ये वाचून दाखविला जाणार आहे. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनामार्फत ग्रामपंचायतींना मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणार्‍या निधीचा विनियोग व संनियंत्रण प्रभावी व परिणामकारक होणे आवश्यक असून, ग्रामस्थांच्या गरजांच्या प्राधान्यक्रमानुसार या निधीचा वापर करणे अपेक्षित आहे, असे ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना लिहिलेल्या संदेश पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर पत्र ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांच्यामार्फत २२ जानेवारी रोजी जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले असून हे पत्र अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदांमार्फत संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांना पाठविण्यात आली. गटविकास अधिकार्‍यांकडून ग्रामविकास मंत्र्यांचे पत्र सरपंचांना पाठविण्यात आली आहेत. पाण्याचा ताळेबंद आराखड्यात सहभाग महत्त्वाचा!टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात यावर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेरी काढून, पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन गाव आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करण्याचा संदेश ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिला आहे. भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ हेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही कर प्रणाली ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा सल्लादेखील ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिला आहे.

'आमचा गाव आमचा विकास'साठी निधीचा वापर करा!'आमचा गाव आमचा विकास' उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने गावाच्या सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व घटकांचा सहभाग घेऊन योजनांचा निधी, स्वनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करण्याबाबत ग्रामसभेत चर्चा करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना लिहिलेल्या संदेश पत्रात केले आहे.