शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

धान्य गोदामाच्या दुरवस्थेची दखल

By admin | Updated: May 10, 2016 03:39 IST

शासकीय धान्य गोदामाच्या दुरवस्थेची दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.

नागपूर : शासकीय धान्य गोदामाच्या दुरवस्थेची दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. सिव्हिल लाइन्स येथील गोदामाच्या दुरवस्थेबाबत ‘दै. लोकमत’ ने २० सप्टेंबर २०१५ रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. अजब बंगल्यानजीकच्या या गोदामातून सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन दुकानांना धान्यपुरवठा केला जातो. अनेक वर्षांपासून दुरुस्ती केली नसल्याने हे गोदाम पूर्णपणे भकास झाले आहे. गोदामाचे टिनाचे शेड तुटले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरून दरवर्षी लाखो रुपयांचे धान्य खराब होते. गोदामाबाहेर फ्लोरिंग नाही. त्यामुळे ट्रकमधून पोती काढून गोदामात ठेवताना धान्य खाली पडते. नंतर ते मातीमिश्रित धान्य उचलून पोत्यांमध्ये भरले जाते. पावसाळ्यात सर्वत्र चिखल असतो. गोदामात जागा नसल्यामुळे व्हरांड्यात वजनकाटा लावून धान्याचे वजन मोजले जाते.गोदामाची इमारत सुमारे ७० वर्षे जुनी आहे. गोदामाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गतच्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे असून, गोदामात धान्य साठवणे, धान्याची उचल करून ते रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम, नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत ‘एफसीआय’कडून पाठविण्यात येणारे गहू, तांदूळ, साखर, डाळ असे सुमारे दोन हजार मेट्रिक टन धान्य या गोदामातील पाचही ब्लॉकमध्ये साठवून ठेवले जाते.