शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर ग्रंथपाल उच्च वेतनश्रेणीला वंचित

By admin | Updated: February 24, 2016 01:45 IST

राज्यातील अनुदानित शाळांमध्ये पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून काम करणारे पदवीधर ग्रंथपाल उच्च वेतनश्रेणीपासून वंचित आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही शासनस्तरावर

मुंबई : राज्यातील अनुदानित शाळांमध्ये पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून काम करणारे पदवीधर ग्रंथपाल उच्च वेतनश्रेणीपासून वंचित आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही शासनस्तरावर अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे.चतुर्थ वेतन आयोग येण्यापूर्वी पदवीधर ग्रंथपालांना ३६५-७६० ची वेतनश्रेणी देय होती. चतुर्थ वेतन आयोगात याला समकक्ष वेतनश्रेणी १४००-२६००, पाचव्या वेतन आयोगात समकक्ष वेतनश्रेणी ५५००-९००० व सहाव्या वेतन आयोगात ९३००-३४८०० इतकी होती. शिवाय ग्रेड पे ४३०० अशी वेतनश्रेणी देय होती. तरी पूर्णवेळ ग्रंथपालांना त्यांच्या पात्रतेनुसार पदवीधर ग्रंथपालांची वेतनश्रेणी दिली जात नव्हती. म्हणून १००हून अधिक ग्रंथपालांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने चतुर्थ वेतन आयोगानुसार १४००-२६००, पाचव्या वेतन आयोगानुसार ५५००-९००० व ६ व्या वेतन आयोगानुसार ९३००-३४८०० आणि ग्रेड पे ४३०० ची वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले.न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने पदवीधर ग्रंथपालांना देय वेतनश्रेणी देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र काही प्रकरणांत शासनाने पदवीधर ग्रंथपालांना चतुर्थ वेतन आयोगात १४००-२६०० वेतनश्रेणीची मागणी असूनही १४००-२३०० या वेतनश्रेणीत टाकले आहे. परिणामी पाचव्या वेतन आयोगात व सहाव्या वेतन आयोगात पदवीधर ग्रंथपालांना निम्न वेतनश्रेणी दिली जात आहे. अवमान याचिकेमधून सुटका होण्यासाठी शासकीय अधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनश्रेणी मंजूर केली आहे, असा भास निर्माण करीत आहेत. (प्रतिनिधी)...तर आंदोलन यासंदर्भातील निवेदन शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले आहे. शासनाने मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पदवीधर ग्रंथपालांना उच्च वेतनश्रेणी दिली नाही, तर राज्यातील ग्रंथपालांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मोते यांनी दिला आहे.