शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी पात्रता निश्चितीसाठी जीआर

By admin | Updated: June 29, 2017 01:49 IST

वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाकरिता रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याबाबत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाकरिता रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत. पात्रता निश्चितीच्या मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय (जीआर) बुधवारी गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील पात्रता ठरविताना ज्यांच्याकडे स्वतंत्र गाळ्यासाठी स्वतंत्र भाडेपावती किंवा भाडेदारी करारपत्र असल्यास त्यांना स्वतंत्र गाळे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, एकापेक्षा जास्त सलग खोल्या असूनही एकच भाडेपावती असल्यास स्वतंत्र गाळे मानले जाणार नाही. शिवाय, बीडीडी चाळीतील सरकारी वसाहतीतील सदनिका संबंधित शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याने सध्या राहत असणा-या कर्मचाऱ्यांचा कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार नाही.पुनर्विकासातील पात्रतेसाठी १३ जून १९९६ पुर्वी बीडीडी चाळ संचालक, व्यवस्थापक यांनी दिलेली भाडेपावती, भाडेदारी करारनामा (नियमितीकरण अथवा हस्तांतरण आदेश), या तारखेपुर्वीचे तत्कालीन गाळेधारकाच्या नाव असलेले वीज बील, टेलिफोन बिल, मतदार यादीचा प्रमाणित उतारा, व्यावसायिक वापरातील गाळ्याबाबत गुमास्ता परवाना किंवा अन्य परवाना आदीपैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे. शिवाय, सध्या राहत असणाऱ्यांना भाडेकरु असल्याचे सिद्ध करण्यासाठी १ जानेवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीतील वीज बिल, टेलिफोन बिल, भाडेपावती, महापालिका पावती अथवा परवाना यातील एका पुराव्याची आवश्यकता असणार आहे. मूळ भाडेकरुचे निधन झाले असल्यास १९८६ च्या तरतुदीनुसार संबंधित भाडेकरुंच्या वारसांकडे कायदेशीर हक्क हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. निवासी आणि अनिवासी गाळे कायदेशीर वारसाच्या नावावर करण्याकरिता उत्तराधिकार प्रमाणपत्रे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संचालकांना प्रलंबित प्रकरणांमध्ये तातडीने हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.