शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दादूस... चल शर्यतीला जाऊ...

By admin | Updated: March 2, 2017 04:41 IST

मुंबईत पहिल्यांदाच रंगणाऱ्या पॉवरबोट शर्यतीच्या थराराची उत्सुकता शिगेला पोहोचली

मुंबई : मुंबईत पहिल्यांदाच रंगणाऱ्या पॉवरबोट शर्यतीच्या थराराची उत्सुकता शिगेला पोहोचली असली, तरी मुंबईचा खरा भूमिपुत्र म्हणून ओळखला जाणारा कोळी समाज मात्र स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला आणखी रंग चढला आहे. एकीकडे तुफानी वेगाने समुद्रावर झेपावणाऱ्या पॉवरबोट सोबतच दुसरीकडे पारंपरिक कोळी होड्यांची शर्यत लक्षवेधी ठरेल.मरिन ड्राइव्हवर ३ ते ५ मार्चदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी आयोजकांनी शर्यतीचा मार्ग आखला असला तरी, यासाठी त्यांना मदत झाली ती कोळ्यांच्या मुलांची. मुंबई समुद्राची पुरेपूर माहिती असलेल्या स्थानिक कोळ्यांच्या मदतीने आयोजकांनी सर्व तयारी केली. त्याचवेळी, मुंबईच्या या आद्य रहिवाशांनाही स्पर्धेत सहभागी करून घेण्याची कल्पना पुढे आल्याचे स्पर्धा आयोजक विवेक सिंग यांनी सांगितले. मुंबईतील एकूण ८ कोळीवाड्यांचा सहभाग या शर्यतीमध्ये असून, प्रत्येक कोळीवाड्यांच्या ५ होड्या शर्यतीत सहभागी होतील. या विशेष शर्यतीमध्ये स्पर्धकांना कमी वेळेत आपली होडी वल्हवून अंतिम रेषा पार करायची आहे. या शर्यतीमध्ये उत्तन, मालवणी, वर्सोवा, माहीम, वरळी, गिरगाव, कुलाबा आणि कफ परेड या ८ कोळीवाड्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, शर्यतीव्यतिरिक्त मच्छीमारी करणाऱ्या बोटींची सजावट स्पर्धाही या वेळी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कोळी समाजातील पुरुषांसह महिला वर्गाचा मोठा सहभाग असेल. होड्यांच्या शर्यतीतील विजेत्यांची घसघशीत कमाई होणार असून, प्रथम क्रमांकास १ लाख, द्वितीय क्रमांकास ६० हजार आणि तृतीय क्रमांकास ४० हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच, बोट सजावटी स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक आहे. (क्रीडा प्रतिनिधी)स्पर्धक म्हणून कस लागणारनेहमी व्यवसायासाठी समुद्रावर स्वार होणारा दर्याचा राजा, या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्पर्धक म्हणून स्वार होईल. यामुळे नक्कीच त्यांच्यापुढे मोठ आव्हान असेल. ‘घरच्या मैदानावर’ ही शर्यत रंगत असली तरी, वेगात वल्हवत पुढे जायचे असल्याने प्रत्येक स्पर्धक ‘राजा’चा या शर्यतीच्या निमित्ताने कस लागणार आहे. पहिल्यांदाच कोळी समाजासाठी अशी होड्यांची स्पर्धा होत असल्याचा खूप मोठा आनंद आहे. जागतिक पॉवरबोट स्पर्धेत आम्हाला सहभागी करून कोळी संस्कृती जगासमोर आणण्याची संधी दिल्याबद्दल स्पर्धा आयोजकांचे खूप आभार. - रोहिदास कोळी, कोळी महासंघ दक्षिण मुंबई विभाग, अध्यक्षअशी रंगणार स्पर्धा : प्रत्येक कोळीवाड्याच्या ५ होड्या शर्यतीत सहभागी होतील. ही शर्यत रिले पद्धतीने होईल. सुरुवातीच्या स्थानापासून प्रत्येकी २०० मीटर अंतरावर होड्या आपल्या संघाचे झेंडे घेऊन उभ्या राहतील. ४० मिनिटांमध्ये रिले पद्धतीने सर्वप्रथम अंतिम रेषा पार करणारा संघ विजयी होईल.