शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दहावी निकालाच्या जीआरने अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट, शिक्षण विभागाचा ‘अभ्यास’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 08:43 IST

SSC Exams: शुक्रवारी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता निकाल कसा लावावा याबाबत ११ पानी जीआर निर्गमित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

यवतमाळ : दहावीची परीक्षा यंदा कोरोनामुळे टळली. मात्र, या परीक्षेने खुद्द अधिकाऱ्यांचीच परीक्षा पाहिली. शुक्रवारी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा न घेता निकाल कसा लावावा याबाबत ११ पानी जीआर निर्गमित केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या ११ पानी जीआरचा अभ्यास करता करता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.दहावीसारखे महत्त्वाचे वर्ष असूनही विद्यार्थ्यांंना शाळेत बसून अभ्यास करता आला नाही तरीही त्यांचा निकाल लावण्याची कठीण जबाबदारी शिक्षण विभागावर आली आहे. शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या निर्णयात गुणदान करण्याच्या किचकट पद्धती सांगितल्या. वर्षभर शाळाच भरलेली नसताना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण कसे द्यावे, हा प्रश्न शिक्षक-मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांपुढेही निर्माण झाला आहे. मध्यंतरी केवळ महिना-दीड महिना दहावीचे वर्ग भरले. मात्र, त्यात केवळ २५ टक्के हजेरी होती. तेवढ्या आधारावर सर्वच विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे शक्य होईल, हा प्रश्न आहे. आता नववीच्या परीक्षेवरून दहावीच्या विद्यार्थ्यांना ५० गुण, वर्षभरातील लेखी मूल्यमापनाच्या आधारे ३० गुण, दहावीतील तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारे २० गुण अशा शंभर गुणांचे मूल्यमापन करून दहावीचा निकाल लावला जाणार आहे. मात्र, हे मूल्यमापन नेमके कसे करावे हा प्रश्न शाळांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी ११ पानी जीआर जाहीर होताच शिक्षकांची व अधिकाऱ्यांची त्रेधा उडाली. हा जीआर क्षणार्धात प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलमध्ये पोहोचला. मात्र, त्यातील किचकट बाबी पाहून शिक्षकच विद्यार्थ्यांसारखे जीआरचा ‘अभ्यास’ करताना आढळले. राज्य शासनाने दहावीच्या बाबतीत आधीच गोंधळ केला होता. त्यात शुक्रवारच्या निर्णयाने आणखी भर पडली, अशी प्रतिक्रिया ‘शिक्षक भारती’चे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी नोंदविली. 

निकाल तयार करताना अशा आहेत अडचणी शासन म्हणते....     - नववीच्या परीक्षेवरून दहावीच्या निकालात ५० गुण द्यावे    - वर्षभरात झालेल्या अंतर्गत लेखी मूल्यमापनावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना ३० गुण द्यावे - दहावीच्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेला २० गुण देणार 

अडचण...- गेल्यावर्षी नववीची वार्षिक परीक्षाच झाली नाही.- यंदा दहावीचे वर्ग न झाल्याने अंतर्गत लेखी मूल्यमापन झालेलेच नाही तर गुण कसे द्यावे?- यंदा दहावीची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा झालीच नाही.