शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गोविंदांची नाकाबंदी

By admin | Updated: August 19, 2014 02:09 IST

दहीहंडीच्या दिवशी वाहतुकीच्या नियमांना सर्रासपणो पायदळी तुडवत वाहन चालवणा:या गोविंदांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला.

मुंबई : दहीहंडीच्या दिवशी वाहतुकीच्या नियमांना सर्रासपणो पायदळी तुडवत वाहन चालवणा:या गोविंदांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला. तब्बल 2,558 गोविंदांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. मात्र पोलिसांच्या मनुष्यबळाअभावी काही ठिकाणी गोविंदा नियम मोडताना दिसत होते. 
दहीहंडीच्या दिवसांत गोविंदा पथकांतील गोविंदांकडून वाहतुकीचे नियम मोडले जातात.  दुचाकींवर तीन-तीन जणांकडून प्रवास करणो, दारू पिऊन वाहन चालवणो, ट्रक-टेम्पोच्या टपावर किंवा केबिनवर बसून प्रवास करण्याचे प्रकार या दिवसांत घडतात.   हे पाहता वाहतूक पोलिसांनी शहर आणि उपनगरांत वाहतूक नियम मोडणा:या गोविंदांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. नेहमी जवळपास 1,100 पोलिसांच्या असणा:या ताफ्यात दहीहंडीच्या दिवशी आणखी 500 ते 600 पोलीस तैनात केले होते. सर्वाधिक ज्या रस्त्यावरून गोविंदांची पथके जातात याची माहिती घेत वाहतूक पोलिसांकडून पूर्णपणो ‘फिल्डिंग’लावण्यात आली होती. तब्बल 50 ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. ही नाकाबंदी केल्यामुळेच वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात 2,558 गोविंदा अडकले.  दुचाकीवरून तीन जण प्रवास करताना दिसत होते, तर ट्रक-टेम्पोच्या केबिनवरही बसून अनेक गोविंदा प्रवास करीत होते.  काही भागात वाहतूक पोलीस असतानाही त्यांच्यासमोरून गोविंदा वाहतुकीचे नियम मोडले. याबाबत सह पोलीस आयुक्त बी.के.उपाध्याय यांनी सांगितले की, नियम मोडणा:या गोविंदांवर  दंडात्मक कारवाई केली. अनेक ठिकाणी नाकाबंदी केल्याने गोविंदा  अडकले. 50 ठिकाणाच्या नाकाबंदीत प्रत्येकी  पाच ते सहा वाहतूक पालीस होते. (प्रतिनिधी)
 
1यंदा दहीहंडी उत्सवाला वादाची किनार असूनही गोविंदा पथकांचा जल्लोष मात्र कायम दिसून आला. सकाळी जागेवाल्यांची हंडी फोडून ठिकठिकाणांहून पारंपरिक वाद्यांच्या गजरात गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यास प्रारंभ केला. आपापल्या विभागातील मानाच्या हंडय़ा फोडून या पथकांनी बडय़ा आयोजकांच्या उत्सवाकडे कूच केले. 
 
2गोविंदा पथकांनी उत्सवाची सुरुवात दक्षिण आणि मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील संकल्प प्रतिष्ठान, घाटकोपर येथील राम कदम यांची हंडी, दादर येथील साहेब प्रतिष्ठान, सुविधाची हंडी आणि जोगेश्वरी येथील भाई जगताप यांच्या हंडी उत्सवात, मनसे आयोजित हंडी, विलेपार्ले येथील कृष्णा हेगडे यांच्या उत्सवामध्ये हजेरी लावून सहा, सात आणि आठ थरांची सलामी देऊन झाली. 
3बक्षिसांची रोख रक्कम स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतलेल्या गोविंदा पथकांनी यंदा केवळ सलामी देऊन आपल्या संस्कृतीचे जतन केले. शिवाय, काही आयोजकांनी या गोविंदा पथकांच्या उत्साहाचा हिरमोड होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक चषकांचे वितरण केले.
4गोविंदा पथकांनी दुपारनंतर ‘ब्रेक’ घेत रस्तोरस्ती नाश्ता करण्यासाठी ठाण मांडले. त्यानंतर, या गोविंदा पथकांनी पुन्हा नव्या उत्साहाने काही उत्सवांमध्ये सलामी देऊन हंडीचे मुख्य आकर्षण असणा:या ठाण्यातील ‘संघर्ष’, ‘संस्कृती’ आणि ‘संकल्प’ प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाकडे मोर्चा वळवला. या उत्सवांमध्ये सहभागी होणा:या गोविंदा पथकांकडे तमाम गोविंदाप्रेमींचे लक्ष असून पुन्हा एकदा विश्वविक्रमाकडे जाण्याचा काही नामांकित पथके प्रयत्न करणार का, याकडे सर्वाची नजर लागून राहिली आहे.   
 
‘आता माझी सटकली’ हिट..
जुन्या आणि नव्या गाण्यांच्या तालावर दरवर्षी बेभान होऊन नाचणारा मुंबईकर गोविंदा यावर्षी ‘सिंघम रिटर्न्‍स’ या चित्रपटातील ‘आता माझी सटकली’ या गाण्यावर तुफान नाचला. अपेक्षित पावसाने मुंबईकडे दिवसभर पाठ फिरवल्याने शॉवरमधून कोसळणा:या सरींमध्ये चिंब भिजलेल्या या गोविंदांनी दिवसभर ‘थरथराट’ सुरू ठेवला आणि मुंबईकरांचा उत्साह द्विगुणित केला.
सूर्याच्या पहिल्या किरणांपासूनच मुंबईवर पावसाची संततधार सुरू झाली आणि हीच रिपरिप कायम राहील, अशी अपेक्षा गोविंदा पथकांना होती. मात्र दुपारी अकरानंतर पावसाने विश्रंती घेतली आणि हंडी फोडण्यासह भिजण्यासाठी आतुर झालेले गोविंदा दिवसभर कोरडे राहिले. तरीही पावसाची उणीव गोविंदांना भासू नये म्हणून वरळी, लालबाग, दादर आणि घाटकोपरसह उर्वरित प्रमुख आयोजकांनी शॉवरची व्यवस्था केली होती. विशेषत: गोविंदा पथकांचा उत्साह कायम राहावा म्हणून  डीजेची व्यवस्था केली होती.