शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा अडचणीत

By admin | Updated: March 3, 2017 05:53 IST

वीस वर्षांपूर्वी केलेल्या ‘छोटे सरकार’ या चित्रपटामुळे सिनेअभिनेता गोविंदा चांगलाच अडचणीत आला आहे

मुंबई : वीस वर्षांपूर्वी केलेल्या ‘छोटे सरकार’ या चित्रपटामुळे सिनेअभिनेता गोविंदा चांगलाच अडचणीत आला आहे. या चित्रपटातील एका गाण्यामुळे समाजाची बदनामी केल्यासंदर्भात त्याच्यावर झारखंडमध्ये १९९६मध्येच गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र त्याला काही दिवसांपूर्वी तेथील दंडाधिकाऱ्यांनी ‘फरारी’ म्हणून घोषित केले. त्यामुळे गोविंदाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालय निकाल देणार आहे. या केसमध्ये गोविंदासह, आनंद-मिलिंद (गीतकार), अलका याज्ञिक (गायिका) आणि उदित नारायण यांनाही आरोपी करण्यात आले आहे.गोविंदाने केलेल्या याचिकेनुसार, तो गीतकार किंवा गायक नसून त्याने केवळ त्या गाण्यावर नृत्य केले आहे. कोणत्याही समाजाला बदनाम करण्याचा हेतू नव्हता.‘पाकुरच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी आपल्याला फरारी घोषित केल्यामुळे पोलीस अटक करण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात एक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रमोशनसाठी झारखंडला जावे लागेल. त्यामुळे तेथील पोलीस आपल्याला अटक करतील. या अटकेपासून तात्पुरता दिलासा देण्यात यावा,’ अशी मागणी गोविंदाने याचिकेद्वारे केली आहे.‘अर्जदार (गोविंदा) समाजात वावरत आहे. त्या चित्रपटानंतरही अनेक चित्रपटांत काम केले आहे, असे असतानाही दंडाधिकाऱ्यांनी अर्जदाराला फरारी म्हणून घोषित केले,’ असा युक्तिवाद गोविंदाच्या वकिलांनी न्या. साधना जाधव यांच्यासमोर केला. न्या. जाधव यांनीही त्यांच्या या युक्तिवादाशी सहमती दर्शवली. मात्र १९९६ला गुन्हा नोंदवूनही एवढ्या उशिरा गोविंदाने उच्च न्यायालयात धाव का घेतली, असा प्रश्न न्या. जाधव यांनी केला. त्यावर गोविंदाच्या वकिलांनी एवढी वर्षे याबद्दल काहीही माहीत नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. मात्र उच्च न्यायालयाने हे मान्य करण्यास नकार देत गोविंदाच्या याचिकेवरील निकाल शुक्रवारी देऊ, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी) >झारखंडमधील पाकुरमध्ये गुन्हा दाखल‘छोटे सरकार’मधील ‘एक चुम्मा तु मुझको उधार देदे और बदले मे यू.पी. बिहार लेले...’ या गाण्यामुळे यू.पी. व बिहारच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत झारखंड राज्यातील पाकुर येथे गोविंदावर गुन्हा नोंदविण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्याला या केसमध्ये फरारी आरोपी म्हणून घोषित करण्यात आले. या केसमध्ये गोविंदासह, गीतकार, गायक, गायिका यांनाही आरोपी करण्यात आले आहे.