शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा सज्ज़, आज विक्रमगडमध्ये दहीहंडीची धूम

By admin | Updated: August 25, 2016 03:20 IST

विक्रमगड तालुका शहर व परिसरात दरवर्षी पारंपारिक पध्दतीने दहीकाला मोठया उत्साहात साजरा केला जातो़

राहुल वाडेकर,

विक्रमगड- विक्रमगड तालुका शहर व परिसरात दरवर्षी पारंपारिक पध्दतीने दहीकाला मोठया उत्साहात साजरा केला जातो़ कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी फोडण्यांत येणाऱ्या दहीहांडी साठी गेल्या काही दिवसांपासून गोविंदा पथके सतत सराव करीत आहेत़ गुरुवारी होणाऱ्या दहीकाल्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत़ मात्र दरवर्षी कृष्णजन्म आणि दहीहांडीच्या दिवशी जमके बरसणाऱ्या पावसाने दडीमारल्यामुळे गोविंदांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण आहे़ कारण गोपाळकाला खेळण्यासाठी पाउस हा हवाच़ त्यात यंदा दहीहांडी खेळतांना दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे़ गुरुवारी साजऱ्या करण्यांत येणाऱ्या दहीकाला उत्सवात विक्रमगड तालुका,विक्रमगड शहर व परिसरातील अनेक गोविंदा पथके सहभागी होत आहेत़ ही पथके विक्रमगड शहरातील गेल्या अनेक वर्षापासून सन्मित्र मंडळाच्या मार्गदर्शखाली सहभागी होत आहेत़ शहराच्या संख्येने ग्रामीण भागात एखादे दुसरेच गोविंदा पथकांची संख्या आहे़ यंदा हा दहीकाला उत्सवालाही महागाईची झळ बसलेली आहे़ दहीहांडीसाठी लागणारी हंडी पूर्वी ५० रुपयांपासून मिळत होती आता त्यांचे दर वाढलेले आहेत़ तर फळांच्या-फुलांच्या किंमतही भरमसाट अशी दुपटीने वाढ झाली आहे़ श्रावण महिना असल्याने महिनाभर असे अनेक सण उत्सव येत असतात व हा उपवासाचा महिना असल्याने फळे व फुलांची मागणी वाढलेली आहे़ तरीही दहीहंडी उत्सव मंडळांच्या उत्साह वाखाणण्याजोगा आहे़ मोठी बक्षिसे नाहीत, ग्लॅमर नाही, पण उत्सव होतो जल्लोषातविक्रमगड हा तालुका ग्रामीण भागात मोडला जातो परंतु ग्रामीण भागासह विक्रमगड शहरातही आजही त्याच जुन्या रुढी-परंपरा जोपसल्या जात आहेत़ आजही तेवढयाच भक्ती भावाने सण, उत्सव एकत्ररित्या साजरे केले जात आहेत़ विक्रमगड व परिसरात साऱ्या तालुक्यात जवळजवळ १०० ते १५० मंडळे आपल्यागाव-खेडया पाडयात व शहरात बांधलेल्या हंडया फोडून मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करीत असतात़ ग्रामीण भाग असल्याने येथील उत्सवात मोठी बक्षिसे नसली तरी सर्वांनी एकोप्याने दहीहांडी बांधायची व सर्वाना ती फोडण्याचा चान्स देऊन आनंदाने पारंपारिक पध्दतीनेच हा उत्सव आजही साजरा होतो आहे़>तालुक्यात विविध भागात विविध क्षेत्रात जवळ जवळ २०० ते ३०० हंडया बांधल्या जातात़ या भागात जास्तीत जास्त तिन ते चार थरापर्यतच हंडयांची उंची असून सुरक्षिततेच्या कारणास्तव उंच हंडयांचे थर बांधले जात नाही़यावेळी डीजेची मोठी मागणी असते. डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई आज ग्रामीण भागात ही पहावयास मिळत आहे़ ग्रामीण भागातील गोंिवंदा मंडळे दुसऱ्या गावातील दहीहांडया फोडण्यासाठी न जाता आपापल्याच गावात हा उत्सव साजरा करतात़पूर्वी विक्रमगड शहरात साऱ्या गाव-पाडयांतील जनता दहीहांडी पाहाण्यासाठी येत होती मात्र आता सर्वच ठिकाणी उत्सव साजरा करत असल्यानेशहरातील गर्दी ओसरु लागली आहे़ काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने उदया अशीच परिस्थित राहाण्याची शक्यता असल्याने या दिवशी घराघरातून गोविंदांवर पाण्याचा वर्षाव केंला जातो.