शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : न्यायालयाने खडसावले तपास यंत्रणेला

By admin | Updated: January 21, 2017 19:42 IST

कॉ. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडेला हजर न केल्याने न्यायालयाने तपास यंत्रणेला खडसावले.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 21 - कॉ. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडेला हजर न केल्याने न्यायालयाने तपास यंत्रणेला खडसावले. ‘कॉ. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे कुठे आहे? त्याला हजर करायला सांगितले होते. जगात कुठेही ठेवा; पण माझ्या तारखेला तो हजर राहिला पाहिजे. कुठे आहेत तपास अधिकारी?’ अशा कडक शब्दांत शनिवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी तपास यंत्रणेच्या पोलिसांना खडसावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
 
पानसरे हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे या दोघांची शनिवारी एकत्रित सुनावणी होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित गायकवाड याला न्यायालयात हजर केले. मागील सुनावणीत डॉ. तावडे याला हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; परंतु पोलिसांनी तावडेला हजर केले नाही. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होताच न्यायाधीश बिले यांनी ‘दोन नंबरचा आरोपी कुठे आहे?’ अशी विचारणा पोलिसांना केली. 
 
तावडेला हजर का केले नाही याची माहिती नसल्याने सरकारी वकील शिवाजीराव राणे काहीवेळ गडबडून गेले. सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी तावडे हा पुणे येथील येरवडा कारागृहात आहे. कारागृह प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे; परंतु त्यांनी उत्तर दिले नसल्याने आरोपीला हजर केले नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायाधीश बिले यांनी ‘आरोपीला हजर करा म्हणून सांगितले होते. आरोपी तुमच्या कोठडीत आहे. त्याला कळंबा कारागृहात का ठेवले नाही? येरवडा कारागृहाचे कारण सांगणे कितपत योग्य आहे? तपास अधिकारी कुठे आहेत? आरोपीला जगात कुठेही ठेवा; पण माझ्या तारखेला तो हजर राहिला पाहिजे,’ अशा कडक शब्दांत खडसावत कानउघाडणी केली. त्यावर सरकारी वकील राणे यांनी पुढील सुनावणीला आरोपीसह तपास अधिकारी सुहेल शर्मा यांना हजर करण्याची हमी दिली. 
 
दरम्यान, आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी साडेतीन महिने झाले तरी डॉ. तावडेला न्यायालयात हजर केलेले नाही; त्यामुळे त्याच्या वकीलपत्रावर मला सही घेता आलेली नाही, असे सांगितले. त्यावर न्यायाधीश बिले यांनी तुमच्या वकीलपत्रासाठी त्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश मी दिले नव्हते. तो पानसरे खटल्यातील दुसरा संशयित आरोपी आहे. सुनावणीला त्याने हजर राहिले पाहिजे. तुम्हाला वकीलपत्रावर त्याची सही घ्यायची असेल तर कारागृहात जाऊन घ्या. त्याचा याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी आहे. त्यामुळे पुढील सुनावणी  6 फेब्रुवारीला ठेवल्याचे न्यायाधीश बिले यांनी सांगितले. या सुनावणीला दोन्ही आरोपींना हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. 
 
‘सनातन प्रभात’ला नोटीस 
आरोपी समीर गायकवाड याला ‘सनातन प्रभात’चे अंक वाचण्यासाठी हवे आहेत, ते त्याला द्यावेत, अशी विनंती अ‍ॅड. पटवर्धन यांनी न्यायालयास केली. न्यायाधीश बिले यांनी अंक पाहिले असता त्यामध्ये ‘सनातनच्या निराधार साधकावर अन्याय होत आहे. हिंदुत्वाची मानहानी करणा-यांना हिंदूराष्ट्रात दामदुपटीने शिक्षा देण्यात येईल, असा मजकूर होता. तो अ‍ॅड. पटवर्धन यांना वाचण्यास सांगितला. अशा आक्षेपार्ह मजकुराचे अंक आरोपीला वाचायला देणे कितपत योग्य आहे? अशी विचारणा करीत संबंधित वृत्तपत्राला नोटीस पाठविल्याचे न्यायाधीश बिले यांनी स्पष्ट करताच अ‍ॅड. पटवर्धन यांनीही ते मान्य केले. 
 
कारागृह प्रशासनाचा अभिप्राय घेणार
आरोपी समीरला कारागृहात जपमाळ, गोमूत्र व उदबत्ती हवी आहे. या वस्तू वापरण्यास त्याला मुभा द्यावी, अशी विनंती अ‍ॅड. पटवर्धन यांनी केली. त्यावर सरकारी वकील राणे यांनी आक्षेप घेत हे कारागृह प्रशासनाच्या नियमांत आहे, का पाहिले पाहिजे. त्यासाठी पुढील सुनावणीला कारागृह प्रशासन अधिकाºयांना हजर करतो. त्यांचा अभिप्राय घेऊन न्यायालयाने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. न्यायालयाने राणे यांची विनंती मान्य केली.