शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शासनकर्त्यांचा आरोपींना पाठिंबा - बाबा आढाव

By admin | Updated: June 20, 2016 21:59 IST

सध्या राज्यात असणा-या सरकारचा डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना पाठिंबा आहे, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी केला.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २० -  सध्या राज्यात असणा-या सरकारचा डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना पाठिंबा आहे, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी केला. 
डॉ. दाभोळकर यांच्या हत्येला आज ३४ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आज या हत्येचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते.  महर्षी शिंदे पूलावर दाभोळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुक्ता दाभोळकर, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख, आम आदमी पार्टीचे सुभाष वारे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी व अनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
सध्या या प्रकरणातील इतके आरोपी पकडले गेलेले असताना मुख्यमंत्री याबाबत एक शब्दही बोलायला तयार नाहीत. खडसे किंवा इतर बाबतीत मुख्यमंत्री बोलतात मात्र दाभोळकर यांच्या हत्येविषयी ते काहीच का बोलत नाहीत हा खरा प्रश्न आहे. मालेगाव बॉंबस्फोटासारखीच फसवणूक याबाबतही होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने आणि आत्मीयतेने पहाण्याची आवश्यकता आहे. अशा वातावरणात प्रबोधनाची चळवळ कशी चलवायची हा प्रश्न आहे. या आरोपींची पाळेमुळे ही गोवा, कर्नाटक याठिकाणी आहेत. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर लढण्याच्या गोष्टी सरकार करत असेल तर अंतर्गत असणाºया राष्ट्रीय प्रश्नाचे काय असा प्रश्नही बाबा आढाव यांनी उपस्थित केला.
यावेळी मुक्ता दाभोळकर म्हणाल्या, सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी. दाभोलकर यांच्या हत्येला ३४ महिने होऊनही तपासयंत्रणा अतिशय संथगतीने काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणातील साक्षीदारांना योग्य ते सरंक्षण देण्याची गरज असून या घटनेकडे पहाण्याचा सरकारचा दृष्टिकोन अतिशय चुकीचा आहे असेही त्या म्हणाल्या. या घटनेच्या मूळापर्यंत जाणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांविरोधी काम करणाºया लोकांना अशाप्रकारे आरोपी सापडत नसतील तर ही अतिशय अवघड गोष्ट आहे. 
सुभाष वारे म्हणाले, न्यायालयाने सरकारी तपास यंत्रणेच्या कानाखाली आवाज काढल्यानंतर तपासाला वेग आला आहे. सरकारचा या प्रकरणाबाबत दुटप्पी भूमिका असल्याने येत्या काळात जनतेला दबाव निर्माण करावा लागेल.  त्यामुळे सरकारने वेळीच योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आमचा विवेकी मार्गही येत्या काळात सरकारला महागात पडेल. सरकारने अजूनही गभीरपणे या प्रकरणाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. 
मालेगाव, मडगाव, ठाणे अशा विविध ठिकाणी बॉंबस्फोटाच्या घटना घडल्या तेव्हाच या संघटनेवर बंदी घातली असती तर आज दाभोळकर, कॉम्रेड पानसरे व कलबुर्गी यांच्यासारखी माणसे गमावण्याची वेळ आपल्यावर आली नसती त्यामुळे या संघटनेवर तत्काळ बंदी घालावी अशी मागणी राष्ट्र सेवा दलातर्फे याठिकाणी करण्यात आली.