शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘कामगारांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा डाव’

By admin | Updated: May 2, 2017 04:09 IST

उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार

मुंबई : उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत असून काँग्रेस पक्ष कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.महाराष्ट्र दिनानिमित्त अशोक चव्हाण यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन केले. त्यानंतर टिळक भवन येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काँग्रेस सरकारने केलेल्या विकास कामांमुळे महाराष्ट्र प्रगत राज्य झाले. काँग्रेस सरकारने राबविलेल्या धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्याची भरभराट झाली. लोकांना रोजगार मिळाला. काँग्रेस सरकारने कायम कामगारांच्या हिताचे रक्षण केले. पण केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष कामगारांच्या व कष्टकऱ्यांच्या हितासाठी या सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करेल, असेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्रातले सरकार कामगारांच्या सुरक्षेवर हल्ला करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार राहावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.यावेळी माजी मंत्री कृपाशंकर सिंह, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र दळवी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकृष्ण ओझा यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)